Dailyhunt
Maharashtra Din Special: मराठी अस्मितेची ओळख फेटा!

Maharashtra Din Special: मराठी अस्मितेची ओळख फेटा!

द्या १ मे महाराष्ट्र दिन! या दिवशी सगळीकडे मराठमोळा उत्साह, पारंपरिक पोशाख आणि डोक्यावर दिमाखात मिरवणारा फेटा हे चित्र आपल्याला अभिमानाने भरून टाकतं.

जनरेशन कितीही बदलले तरी फेट्याची क्रेझ कमी झालेली नाही.

उलट लग्न, सण, रॅली किंवा फोटोशूट सगळीकडे फेटा हा स्टाईल स्टेटमेंट बनला आहे. पण हा फेटा केवळ फॅशन नाही, तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे. चला तर मग, महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया फेट्याचे काही खास आणि लोकप्रिय प्रकार.

1) रांगडा आणि रुबाबदार: कोल्हापुरी फेटा
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध असलेला फेटा म्हणजे कोल्हापुरी फेटा. गडद रंग, लहरिया किंवा खास डिझाईन आणि बांधण्याची स्टाईल यामुळे हा फेटा खूपच उठून दिसतो. हा फेटा बांधल्यावर एकदम 'रॉयल' आणि 'रांगडा' लूक येतो, म्हणूनच लग्नसमारंभ आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये तरुणांमध्ये याची मोठी डिमांड आहे.

2) सुसंस्कृत आणि भारदस्त: पुणेरी फेटा
पुणेरी फेटा म्हणजे साधेपणातला क्लास! हलका सुती कापड, त्यावर जरीची सोनेरी किनार हा फेटा एकदम एलिगंट आणि सुसंस्कृत लूक देतो. राजकारणी, विचारवंत किंवा प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये हा फेटा आजही लोकप्रिय आहे. साधेपणातही स्टाईल दाखवायची असेल, तर पुणेरी फेटा परफेक्ट!

3) शिवकालीन अभिमान: मावळी फेटा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आठवण करून देणारा मावळी फेटा म्हणजे अभिमानाची गोष्ट! याची बांधणी इतर फेट्यांपेक्षा वेगळी आणि घट्ट बसणारी असते. शिवजयंती, किल्लेभेट किंवा ऐतिहासिक कार्यक्रमांमध्ये तरुण हा फेटा बांधून आपल्या इतिहासाशी जोडलेले असल्याचा अभिमान व्यक्त करतात.

4) नऊवारी/शाही फेटा:
नऊवारी साडीच्या कापडातून बनवलेले फेटे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा परफेक्ट कॉम्बिनेशन!

5) बांधणी फेटा:
लाल, पिवळा, हिरवा अशा रंगांच्या मिश्रणात आणि ठिपक्यांच्या डिझाईनमध्ये हा फेटा खूप आकर्षक दिसतो. सणासुदीला हा फेटा एकदम परफेक्ट चॉइस आहे.

6) सिल्क आणि चांदेरी फेटा:
लग्नसमारंभात रॉयल आणि क्लासी लूक हवा असेल, तर सिल्क किंवा चांदेरी फेटा बेस्ट ऑप्शन ठरतो.

रंगांचे महत्त्व

भगवा फेटा:
शौर्य, पराक्रम आणि उत्साहाचे प्रतीक. शिवजयंती, सण-उत्सवात याला खास महत्त्व असते.

पांढरा फेटा:
शांतता आणि साधेपणाचे प्रतीक. ग्रामीण भागात आजही दैनंदिन वापरात पांढरा फेटा पाहायला मिळतो.

फेटा म्हणजे फक्त एक पारंपरिक अॅक्सेसरी नाही तो आपल्या संस्कृतीचा अभिमान, इतिहासाची ओळख आणि स्टाईलचा डौल आहे. हल्लीच्या मॉडर्न जगातही फेट्याने आपली जागा टिकवून ठेवली आहे, हेच त्याचं खासपण आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त, फेटा बांधा आणि आपल्या मराठमोळ्या अस्मितेला सलाम करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar