मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतल्यापासून राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा सुरू झाल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्याभरात 49 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यानंतर आता महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट झाल्याचे पाहायला मिळत राज्य सरकारच्या गृह विभागाने 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबईला नवे उपायुक्त मिळाले असून या बदलांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत नव्या नेतृत्वाची एन्ट्री झाली आहे.
मुंबई शहरात एकूण चार पोलीस उप आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे उप आयुक्त संदीप घुगे, नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि फोर्स वनचे पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांची मुंबई शहरात पोलीस उप आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह एस. परदेशी यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उप आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची पुणे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागात पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
राज्यातील 21 पोलीस अधिकाऱ्याची कुठे झाल्या बदल्या
- जय के. बन्सल - पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य
- ससगुरी विशाल आनंद - पोलीस अधीक्षक, धुळे
- बाळासाहेब पाटील - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
- सोमनाथ घागे - सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व सेवा), पोलीस महासंचालक कार्यालय
- रविंद्रसिंह एस. परदेशी - उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
- संदीप घुगे - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
- श्रवण दत्त - अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) व सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर
- मुम्मका सुदर्शन - पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
- बोडोंपत एस. स्वामी - पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)
- अनुज मिलिंद तारे - पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
- अनुराग जैन - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
- अश्विनी सानप - पोलीस अधीक्षक, नंदुरबार
- तेगबीर सिंग संधू - पोलीस अधीक्षक, जालना
- राजकुमार शिंदे - पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे
- निखिल खाटमोडे - पोलीस अधीक्षक, वाशिम
- आयुष नोपानी - पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
- पंकज कुमावत - पोलीस अधीक्षक, परभणी
- नितीन कदम - पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)
- सूरज गुंजाळ - अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव
- गजानन राजमाने - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
- दत्ता लक्ष्मण तोटेवाड - अपर पोलीस अधीक्षक, अमरावती

