Thursday, 16 Sep, 3.51 pm My महानगर

ताज्या बातम्या
माजी मंत्री म्हणू नका दोन दिवसांत कळेल, चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षात असलेल्या भाजपने अनेकवेळा सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. लवकरच भाजपची सत्ता येईल असे भाजपकडून सांगण्यात येते. एका कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री म्हणू नका दोन-तीन दिवसांत कळेल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन ते तीन दिवसांत नक्की काय घडणार आहे याबाबत तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. संभाजी ब्रिगेडचा युतीचा प्रस्ताव आला तर भाजप कोअर कमिटी त्यावर चर्चा करेल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडूनही युतीचा प्रस्ताव आला नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देहू येथे एका खाजगी दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना व्यासपीठावरुन माजी मंत्री असे संबोधण्यात येत होते. यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे की, 'माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल तुम्हाला' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून येत्या तीन दिवसांत असे काय घडणार आहे. अशी चर्चा सुरु आहे.

संभाजी ब्रिगेडच्या युतीवर चर्चा

भाजपसोबत युती करण्यासाठी सुरु असलेल्या चर्चेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रितिक्रिया दिली आहे. भाजप जागतिक पक्ष आहे त्यामुळे आमच्याकडे लगेच निर्णय होत नाहीत असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर ९ जणांची कोर कमिटी निर्णय घेईल. मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे पहिला कोणाकडे युतीचा विषय आला तर त्यांनी तो माझ्याकडेच शेअर केला पाहिजे, आम्ही एक जागतिक पक्ष आहोत. देशात आमचे १२ राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत. यामुळे सहज लवकर असा निर्णय होत नाही अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या युतीबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे सरकारची समाजाच्या डोळ्यात धूळफेक

ओबीसी आरक्षणाबाबतच्या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सरकार कुठलेही पाऊल उचलत नाही. वटहुकूम जर काढायचाच होता तर ३-४ महिन्यांपूर्वीच काढायला हवा होता. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करत आहे. असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.


: लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टिप्पणी करण्याचा अधिकार, अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top