Prepare time: 10 minCook: 15 minsReady in: 25-30 mins
Ingredients
- मखाना - 3 कप
- गव्हाचे पीठ- 1 कप
- कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
- मीठ - चवीनुसार
- पाणी - गरजेनुसार
- तेल किंवा तूप - भाजण्यासाठी
Directions
- 3 कप मखाना मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत.
- थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करावी.
- आता या पिठात थोडे गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालावे.
- आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
- आता मळलेल्या पिठाचे लहान लहान गोळे करून पोळी लाटावी.
- आता तव्यावर तेल किंवा तूप टाकून पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावी.
- ही पोळी तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

