Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mango Coconut Barfi : मँगो कोकोनट बर्फी!

Mango Coconut Barfi : मँगो कोकोनट बर्फी!

Prepare time: 10 minutesCook: 20 MinuteReady in: 30 Minute
Ingredients

  • १ कप ओलं खोबरं (किसलेलं)
  • १ कप २ मध्यम आंब्याच्या फोडी
  • १ कप साखर
  • १/२ कप दुधावरील साय

Directions

  1. मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, आंब्याच्या फोडी आणि साखर घालून घ्या.
  2. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या.
  3. तयार मिश्रण जाड बुडाच्या पॅनमध्ये ओता आणि मंद आचेवर शिजवायला ठेवा.
  4. मिश्रण सतत हलवत राहा म्हणजे ते पॅनला चिकटणार नाही.
  5. यानंतर त्यात दुधावरील साय घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  6. मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि कडांपासून सुटेपर्यंत शिजवत राहा.
  7. एका प्लेट किंवा ट्रेमध्ये हलकं तूप किंवा तेल लावून ग्रीस करून घ्या.
  8. तयार मिश्रण ट्रेमध्ये ओतून चमच्याने समान पसरवा.
  9. मिश्रण कोमट असतानाच सुरीने आवडत्या आकाराच्या वड्या कापा.
  10. बर्फी पूर्ण थंड झाल्यावर सर्व्ह करा किंवा एअरटाइट डब्यात साठवा.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar