Sunday, 19 Jan, 6.31 pm My महानगर

क्रीडा
मी रिवॉल्वर घेऊन आत्महत्येसाठी निघालो होतो - प्रवीण कुमार

भारतीय टीमचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार नुकताच आपल्या आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा
केला आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रवीण कुमारने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. २०१८ साली प्रवीण कुमार इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण त्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे प्रविणने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
एकेदिवशी प्रवीण कुमार आत्महत्या करायला मफलर आणि रिवॉल्वर घेऊन घरातून बाहेर पडला आणि डार्ईव्ह करत हरिद्वारला पोहचला. यावेळी त्याने स्वत:लाच विचारले हे काय आहे सगळं? आणि आता आपण आयुष्य संपवलं पाहीजे असा विचार त्याच्या मनात आला.
सध्या प्रवीण कुमारवर थेरेपी आणि औषध उपचार सुरू आहेत. स्विंग किंगच्या नावाने प्रवीण कुमारला ओळखला जायचा. २०११ साली त्याला डेंग्यू झाला. त्यामुळे वल्ड कपच्या मॅचला तो खेळू शकला नाही. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात बॅड पॅच आला. २०१४ ला आयपीएल मध्ये देखील त्याच्यावर बोली लावण्यात आली नाही.

पुन्हा क्रिकेट खेळायचं आहे

२०१४ तेव्हापासून तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्याला संघात स्थान मिळत नव्हते. 'द इंडियन एक्स्प्रेस' ला दिलेल्या मुलाकखीनुसार त्याला पुन्हा क्रिकेट टीममध्ये यायचे आहे. प्रवीण कुमार म्हणाला की मला क्रिकेटमध्ये परत यायचे आहे. मला माहित असलेली आणि आवडणारी ही एक गोष्ट आहे.

'इंडियन एक्स्प्रेस' मध्ये हा अहवाल आल्यानंतर कित्येक क्रिकेटर्सनी प्रवीण कुमारबद्दल सहानुभूती व पाठिंबा दर्शवून ट्विट केले. प्रग्यान ओझा यांनी 'इंडियन एक्सप्रेस' चा लेख शेअर करताना लिहिले. आपण ते सोडण्याचा निर्णय घेऊन समजूतदारपणा दर्शविला आहे. स्वतःची काळजी घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top