Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mixer Grinder : मिक्सर वर्षानुवर्षे चालेल नव्यासारखा; वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

Mixer Grinder : मिक्सर वर्षानुवर्षे चालेल नव्यासारखा; वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

किचनमधील काम सोपं व्हावं यासाठी मिक्सर ग्राइंडरचा वापर करण्यात येतो. मसाला वाटण्यापासून ते ज्यूस बनवण्यापर्यंत मिक्सर उपयुक्त ठरतो. परंतू अनेकदा घाईगडबडीत आपल्याकडून मिक्सर वापरताना लहान-सहान चुका होतात, ज्यामुळे मिक्सर खराब होतो.

म्हणूनच, मिक्सर जार वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे वर्षानुवर्षे तो नव्यासारखा चालेल जाणून घेऊयात.

  • मिक्सर जारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ भरू नये. असे केल्याने मोटारवर अतिरिक्त ताण येतो आणि ती जळू शकते.
  • गरम सूप किंवा उकडलेले पदार्थ लगेच मिक्सरमध्ये वाटू नयेत. वाफेमुळे जारमध्ये दाब निर्माण होऊन झाकण उडू शकते.
  • मिक्सरमध्ये पदार्थ कोमट झाल्यावरच वाटावेत.
  • मिक्सर सतत जास्त वेळ चालू ठेवू नये. काही मिनिटे फिरवल्यानंतर विश्रांती द्यावी, ज्यामुळे मोटार जास्त गरम होणार नाही.
  • मिक्सर जारमध्ये खडे मसाले थेट बारीक करून नयेत. यामुळे ब्लेडची धार कमी होऊ शकते.
  • वेळोवेळी जारचे ब्लेड तपासावे. त्यांची धार कमी झाल्यास वेळीच बदलावे.
  • मिक्सरचा मुख्य भाग कधीही पाण्यात बुडवू नये, तो फक्त ओल्या कापडाने पुसावा.
  • जारमध्ये दुर्गंधी येत असल्यास त्यात थोडे कोमट पाणी, लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा घालून फिरवा. दुर्गंधी दूर होईल.
  • वापरानंतर जार आणि ब्लेड स्वच्छ धुवा आणि कोरडे करूनच ठेवा.
  • मिक्सर वापरताना हात पूर्णपणे कोरडे असावेत.
  • वापरात नसताना मिक्सर नेहमी मेन प्लग मधून बंद करावा.
  • वापरण्याआधी मिक्सरची वायर खराब किंवा तुटलेली नाही ना, याची वेळोवेळी खात्री करा.

Steel Glass Reuse : 'या' भन्नाट आयडियांनी जुन्या स्टीलच्या ग्लासला द्या स्टायलिश लूक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar