Tuesday, 04 May, 11.19 pm My महानगर

ताज्या बातम्या
मोबाईलवर बघून चालणार्‍यांना अडथळा दिसताच गुगल देणार अलर्ट, काय आहे फीचर?

जगात सर्वच वयोगटातील नागरिकांना, तरुणांना आणि लहान मुलांना मोबाईलचा प्रचंड मोह आहे. अगदी चालताना आणि एखाद्याशी समोरा-समोर बोलतानाही लोकं मोबाईलचा वापर करत असतात. या मोबाईलमुळे दुरवच्या माणसाशी संवाद वाढलाय परंतु जवळच्या माणसांशी नाळ तुटत आहे. आपण जर चालतना मोबाई वापरत असू तर समोरुन येणाऱ्या व्यक्तिला किंवा वस्तूला धडकतो त्यामुळे आपल्याला गंभीर इजाही होते. परंतु आता जर तुम्ही चालताना मोबाईल वापरत असाल आणि तुमचे लक्ष पुढे नसून खाली मोबाईलमध्ये असेल तर तुमचा मोबाईलच तुम्हाला पुढे बघण्यास सांगणार आहेत. गुगलने निर्मित केलेल्या नव्या फिचरमध्ये मोबाईलच तुम्हाला पुढे बघण्याचा अलर्ट देणार आहे.

हेड्स अप हे नवीन फिचर गुगलकडून डिजिटल वेलबीइंग अॅप्लिकेशनमध्ये देण्यात आले आहे. या फिचरमुळे जर एखादा वापरकर्ता चालताना आपला फोन वापरत असेल वापरकर्त्याचे संपुर्ण लक्ष असेल तर आता गुगलच हे फिचरच युजरला वर बघण्यास सावध करणार आहे. हे फिचर सध्या बेट अपडेटसह गुगलच्या पिक्सेल स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. या फिचरबाबत माहिती सर्वात पहिले XDA Developers मध्ये देण्यात आली होती.

काय आहे हेड्सअप फीचर

गुगलकडून देण्यात आलेल्या हेड्सअप फीचरमध्ये काही नोटिफिकेशन देण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या पावलांकडे ( Your Steps) सावध राहा (Stay Alert) तसेच वर (Look Up)असे नोटीफिकेशन देण्यात आले आहेत. एकदा हे नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये सेट केल्यास तुम्ही चालत असताना जर खाली बघून चालत असाल तर हे फीचर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल आणि सावध करेल. हे फीचर तुम्हाला डिजीटल वेलबीइंग अॅप्लिकेशनच्या सेटिंग्जमध्ये रिड्यूस इंटररप्शन्स मध्ये गेल्यास हेड्स अप फीचर मिळेल. संबंधित फीचर वापरकर्त्याने चालु केल्यास तुम्हाला यामध्ये अधिक पर्याय (settings) मिळतील.

गुगलकडून देण्यात आलेलं हे फीचर अजून सर्व मोबईलमध्ये उपलब्ध झाले नाही. परंतु गुगल पिक्सलच्या फोनमध्ये अपडेट केल्यावर हे फीचर मिळेल. तसेच हेड्सअप फीचर व्यापक स्वरुपात कधी यईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती गुगलकुडून देण्यात आली नाही. परंतु येत्या काही महिन्यांत हे फीचर सर्वच फोनमध्ये यला मिळण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top