Friday, 11 Jun, 9.11 am My महानगर

देश-विदेश
Monsoon 2021: १२१ वर्षानंतर मे महिन्यात दुसऱ्यांदा बरसला सर्वाधिक पाऊस- IMD

देशात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मान्सूनसंदर्भात आपले मासिक जाहीर केले आहे. या मासिकातील अहवालाप्रमाणे, देशात गेल्या १२१ वर्षानंतर मे महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामागे दोन कारणं आहेत एक म्हणजे सलग घोंघावलेली दोन चक्रीवादळे आणि दुसरे म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर पसरलेली अशांतता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले की, यंदा मे महिन्यातील कमाल तापमान ३४.१८ डिग्री सेल्सियस नोंदविले गेले जे साल १९०१ नंतरचे चौथे सर्वात कमी तापमान होते. हे तापमान १९७७ नंतरचे देशातील सर्वाधिक कमी तापमान आहे. तर कमाल तापमान ३३.८४ डिग्री सेल्सियस रिकॉर्ड केले.

मे २०२१ मध्ये संपूर्ण देशात पडला १०७.९ मिमी पाऊस

यापूर्वी १९१७ या वर्षात मे महिन्यात सर्वात कमी तापमान ३२.६८ डिग्री नोंदविले गेले. परंतु या काळात देशातील कोणत्याही राज्यात मे महिन्यात उष्णतेची लाट आली नाही. मे २०२१ मध्ये संपूर्ण देशात १०७.९ मिमी पाऊस पडला असून तो सरासरी पावसापेक्षा ६२ मिमी जास्त आहे. यापूर्वी १९९ मध्ये सर्वाधिक पाऊस (१ १.७ १०मिमी) झाला होता.

यंदा मे महिन्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकटे आली. अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळाने कहर केला तर बंगालच्या उपसागरामध्ये यास चक्रीवादळ घोंघावले. आयएमडीने म्हटले आहे की, २०२१ वर्षातील उन्हाळ्याचे तीन महिने उत्तर भारत आणि पश्चिम राज्यांमध्ये सुरु असलेल्या वातावरणातील अशांततेमुळे सामान्यपेक्षा जास्त होते.


कुलभूषण जाधव प्रकरण; फाशीच्या शिक्षेबाबत पाकिस्तानने उच्च न्यायालयात जाण्यास दिली परवानगी


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top