Monday, 14 Jun, 4.03 pm My महानगर

ताज्या बातम्या
Mumbai Corona Update: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावी पहिल्यांदाच शून्यावर

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले. पण आता कोरोनाची ही दुसरी लाट मंदावत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईला मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. कारण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या पहिल्यांदाच शून्यावर आली आहे. गेल्या २४ तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही खूप मोठी पॉझिटिव्ही बाब आहे.

कोरोना काळाच्या सुरुवातील धारावीत व्हायरसचा उद्रेक झाला होता. पण आता धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच आज दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. म्हणजेच गेल्या २४ तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही आहे. जेव्हापासून कोरोनाला सुरुवात झाली तेव्हापासून ते आतापर्यंत सातव्यांदा धारावीत एकही रुग्ण आढळला नाही आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २५ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारी या दिवशी धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज धारावीत शून्य रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत दादरमध्ये अवघे ३, माहिममध्ये ६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत ८ एप्रिलला दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली होती. या दिवशी ९९ नवे कोरोनाबाधित आढळले होते.

मुंबई काल, रविवारी ७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती आणि १९ रुग्ण मृत्यूमुखी पडले होते. तर ७०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यानुसार रविवारी मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १६ हजार ५७९वर पोहोचल. यापैकी १५ हजार १८३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६ लाख ८३ हजार ३८२ कोरोनामुक्त झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top