मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळ एसटी आणि इको कार यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी ३ जण जाहीच ठार झाले, तर एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इतर तिघा गंभीर जखमींना मुंबईत पुढील उपचारांसाठी नेण्यात आलं आहे. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये संतोष भोनकर (४१), संतोष साखरकर (४२) आणि चांदोरकर (४०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पेण तालुक्यातल्या कोलेटीवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. या आपघाताची नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.
अपघातग्रस्त बस समोरासमोर झाली धडक
महामार्गावरून नागोठण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या इको कारला समोरून येणाऱ्या एसटीच्या निमआराम बसची जोरात धडक बसली.

