मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे तुम्ही पार्टनर, फ्रेंड्ससोबत मुव्हि नाईट्स, डिनर पार्टी किंवा नाईट आऊटींगचा प्लॅन करू शकता. सध्या शाळा-कॉलेजच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे मित्र मैत्रिणींसोबत हॅंगआउटचा प्लान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
मुंबईत फिरण्यासाठी आणि नाईट आऊटसाठी अनेक उत्तम पर्याय आहेत. आज आपण मित्रांसोबत धम्माल करण्यासाठी मुंबईतील अशाच सर्वोत्तम आणि रमणीय ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
मरिन ड्राइव्ह
मुंबईत रात्री चील आउट करण्यासाठी मरिन ड्राइव्ह हा उत्तम पर्याय आहे. येथे सनसेट पाहण्यासाठी कायमच गर्दी असते. तुम्ही जर पार्टनरसोबत जाणार असाल तर येथे रात्री अविस्मरणीय वातावरण अनुभवयाला मिळेल. येथे असलेल्या दगडांवर बसून तुम्हाला फोटोसेशन सुद्धा करता येईल.
छोटा काश्मीर
तुम्ही फ्रेंड्ससोबत छोटा काश्मीरला सुद्धा भेट देऊ शकता. गोरेगावमध्ये असलेले हे ठिकाण कपल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला तलावात बोटिंग करण्याचा अनुभव घेता येईल.
वर्सोवा बीच
वर्सोवा बीच हे ठिकाण अंधेरीत आहे. या ठिकाणची खासियत सांगायची झाल्यास 2.7 किमीच्या खडकांनी बनलेला आहे. येथे तुम्ही फ्रेंड्ससोबत रात्रीचे चील आउट करू शकता. रात्रीची निरव शांतता तुम्हाला येथे अनुभवता येईल. दिवसाही येथे फिरण्यासाठी उत्तम वातावरण असते.
बांद्रयाचा किल्ला
कस्टला डी अगुआडा म्हणजेच बांद्रयाचा किल्ला सुद्धा फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला उंचच उंच नारळाची झाडे दिसतील. येथे सुद्धा तुम्ही तासनतास मित्रांसोबत वेळ घालवू शकता, फोटोसेशनही करू शकता.

