Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Water Metro : आली रे आली! वॉटर मेट्रोची पहिली बोट मुंबईत पोहोचली, 16 मार्गांवर धावणार

Mumbai Water Metro : आली रे आली! वॉटर मेट्रोची पहिली बोट मुंबईत पोहोचली, 16 मार्गांवर धावणार

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित मुंबई वॉटर मेट्रोची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.

या वॉटर मेट्रोच्या ताफ्यातील पहिली अत्याधुनिक स्वीडिश इलेक्ट्रिक बोट मुंबई बंदरात पोहोचली आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPT) ही बोट दाखल झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तिच्या मार्गिका चाचण्यांना (Trials) सुरुवात होणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ही बोट सध्या कस्टम क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील जलवाहतुकीच्या विस्ताराच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या 877 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून राज्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. देशात डिसेंबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात जल मेट्रोची वाहतूक सुरू होईल अशी घोषणा केली होती. त्यासाठीच आता हालचाली सुरू झाल्या आहेत. कस्टम क्लिअरन्स मिळताच कॅन्डेलाची चाचणी केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, कॅन्डेला पी-12 ही बोट स्वीडनहून मागवण्यात आली असून ती इलेक्ट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही बोट 25 नॉट्स म्हणजेच प्रति तास 45 किमी या वेगाने धावणार आहे. यामध्ये 30 प्रवासी बसतील एवढी क्षमता असणार आहे. मुंबईतील जल मेट्रो प्रकल्पासाठी एकूण 11 कॅन्डेला पी12 फेरी मागवल्या आहेत. या फेरी सर्वप्रथम दोन मार्गांवर प्रवास करतील. पहिला मार्ग गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग असा असेल. पुढील मार्ग मांडवा ते वर्सोवा-मढ असा असणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात जलवाहतुकीचे व्यापक जाळे विकसित करण्याच्या राज्य सरकाच्या योजनेचा हा एक भाग आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar