Thursday, 22 Jul, 2.10 pm My महानगर

महाराष्ट्र
मुसळधार पावसाने शहापूर, मुरबाड तालुक्यातील १५० गाव पाड्यांचा संपर्क तुटला

सतत पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला पुर आल्याने बुधवारी रात्री शहापूर किन्हवली डोळखांब या मार्गावरील रस्त्याला जोडलेला सापगाव पुल पाण्याखाली गेला आहे. नदीला पुर आल्याने या पुराच्या पाण्यात सापगावच्या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून हा पुल पुर्णत खचला आहे. पुलाचे लोखंडी रेलिंग वाहून गेले असून पाण्याच्या प्रवाहामुळे डांबर वाहून गेल्याने पुलाला तडे गेल्याने सर्वत्र लहान मोठी भगदाड पडली आहेत हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून पुल केव्हाही कोसळेल असे भयानक चित्र दिसत आहे.

सार्वजनिक वाहतूक बंद

प्रशासनाने तातडीने या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.दरम्यान सापगाव पुलावरील पाणी अध्यापही ओसरले नसल्याने शहापूर किन्हवली मुरबाड या मार्गावरील वाहतूक ठप्प पडल्याने जवळपास १५० गाव पाड्यांचा संपर्क शहापूर शहराशी तुटला आहे. भातसा नदीचे पाणी नदी किनारी असलेल्या सापगाव गावातील काही घरामध्ये शिरल्याने अनेक गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने भातसा नदीला पुर आला परिणामी बुधवारी मध्यरात्री सापगाव पुल पाण्याखाली आहे. भातसा नदीची पुर परिस्थिती भयानक झाली असून पराच्या पाण्याच्या प्रवाहात हा पुल पाण्याखाली गेला असून त्यांची प्रचंड दैन्यवस्था झालेली दिसत आहे. दरम्यान सापगाव पुल खचल्याची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाने येथील दैनंदिन सार्वजनिक वाहतूक बंद केली आहे.

१५० गाव पाड्यांचा संपर्क तुटला

दरम्यान पुल खचल्याने परिवहन महामंडळाची एसटी वाहतूक पुर्णपणे बंद पडली आहे.यामुळे परिणामी शहापूर शहराकडे ग्रामीण भागातून नोकरीसाठी येणारे चाकरमानी, मजूर, भाजीविक्रेते, दुधविक्रेते यांना शहापूरकडे येता येत नसल्याने हे अडकून पडले आहेत.यामुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान जोपर्यंत भातसा नदीला आलेला पुर ओसरत नाही तोपर्यंत सापगाव पुलाची दुरुस्ती करता येणार नाही अशी एकंदरीतच परिस्थिती आहे.तोपर्यंत शहापूर किन्हवली मुरबाड वाहतुकीसाठी हा पुल खुला होणार नाही अशी गंभीर परिस्थिती दिसत आहे. यामुळे पाऊस आणि पुलावरील पुल यांच्या कस्टडीत १५० गावं, पाडे सापडले आहेत पुलावरील पाणी केव्हा कमी होईल, या प्रतिक्षेत या मार्गावरील वाहनचालक नागरिक डोळे लावून बसले आहेत.


बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रेल्वे वाहतूक ठप्प

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top