Friday, 27 Nov, 4.30 pm My महानगर

लाईफस्टाईल
नकली ब्युटी प्रोडक्ट कसे ओळखाल?

महिलेचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी मेकअपसह ब्युटी प्रोडक्ट काम करत असतं हे नाकारता येत नाही. यासह मेकअप करून चेहऱ्यावर असणारे डाग किंवा व्रण सहजतेने लपवण्यास मदत होते. परंतु यासाठी आवश्यकता असते ती तुमच्याकडील असणाऱ्या मेकअपच्या प्रोडक्टची गुणवत्ता उत्तम असणं. यासाठी तुम्ही ब्रॅण्डेड आणि विश्वासाहर्य ब्युटी प्रोडक्ट खरेदी करणं महत्वाचं आहे. जास्त करून महिला ब्रॅण्डेड ब्युटी प्रोडक्टच्या नावाखाली कित्येकदा महाग आणि नकली मेकअप ब्युटी प्रोडक्टची खरेदी करतात. मात्र ज्यावेळी या प्रोडक्टची खरेदी केल्यानंतर ते चेहऱ्यावर अप्लाय केले जाते तेव्हा तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणूनच मेकअपचे साहित्य खरेदी करताना नकली प्रोडक्ट कसे ओळखता येतील, यासाठी महिलांकरता काही टिप्स.

किंमतीमधील फरक

ब्रॅण्डेड उत्पादने नेहमी परवानाधारक किरकोळ विक्रेत्यांद्वारे विकले जातात. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेल्या विक्रेत्यांकडे मिळणारे प्रोडक्ट ब्रॅण्डेड आहेत का हे निश्चित करा. तुम्ही जर ब्युटी प्रोडक्ट ऑनलाइन खरेदी करत असल्यास, विशिष्ट ब्रँड खरेदी करण्यासाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. विना परवानाधारक स्टोअर्समध्ये नकली ब्युटी प्रोडक्ट उपलब्ध असतात आणि त्यांची किंमत ब्रॅण्डेड प्रोडक्टच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे तुम्हाला ओरिजनल प्रोडक्टची किंमत माहित असणं आवश्यक आहे.

प्रोडक्टची पॅकिंग चेक करा

पॅकेजिंगद्वारे तुम्ही वास्तविक आणि नकली मेकअप प्रोडक्टमधील फरक ओळखू शकता. कमी दर्जा असणारे प्लास्टिक, फिकट रंग आणि योग्य फिटिंग नसणारे मिरर स्पष्टपणे सूचित करतात की तुम्ही खरेदी करीत असलेले मेकअप प्रोडक्ट नकली आहेत. काहीवेळा, प्रोडक्टची नावे बरोबर लिहिलेली नसतात. म्हणजेच, उत्पादनाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काहिसा बदल दिसतो. त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे.

सोशल मीडियावर होणाऱ्या शॉपिंगपासून सावध रहा

सोशल मीडियावर कित्येक अकाऊँट असे आहेत की, त्यावर ब्युटी प्रोडक्टची विक्री करण्यात येते. यासर्व अकाऊँटचा असा दावा असतो की, त्या अकाऊँटच्या माध्यमातून विक्री होणारे प्रोडक्ट १०० टक्के ओरिजनल असल्याचे सांगितले जाते. तसेच हे ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देखील दिल्या जातात. त्यामुळे हे ऑनलाईन प्रॉडक्ट काळजीपूर्वक खरेदी करा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top