Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nasarapur Case : 28 दिवसांत आरोप निश्चिती, नसरापूर प्रकरणाचा फास्ट निकाल लागणार

Nasarapur Case : 28 दिवसांत आरोप निश्चिती, नसरापूर प्रकरणाचा फास्ट निकाल लागणार

पुणे : नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी (28 मे) विशेष न्यायालयात पार पडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत पोलिसांनी फक्त 28 दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून न्याय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. न्यायालयाकडून आरोपीविरोधात प्राईमा फेसी पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालाकडून नोदवण्यात आले असून आता खटल्याची रोज सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास अधिकारी या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विविध वैद्यकीय चाचण्यांचे पुरावे सादर केले. आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्यात आले आणि शेवटी पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे चार्जशीट अवघ्या 15 दिवसांत दाखल केले होते. त्याच चार्ज शीटवर गुरुवारी सुनावणी पार पडली. याप्रकरणातील लैंगिक चाचणी, सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली. तसेच, दोषारोप पत्राची माहिती देखील यावेळी कोर्टाला देण्यात आली. आरोपी भीमराव कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांन्वये (कलम 103(1), 64, 65(2), 74, 137(2), 140(1) आणि पोक्सो ॲक्ट 2012 च्या कलम 4, 6, 8 व 12 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीमुळे पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय नक्कीच मिळणार आहे. पोलीस प्रशासन आता या खटल्याच्या दररोजच्या सुनावणीसाठी सज्ज झाले असून, लवकरात लवकर निकाल देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय ?

1 मे रोजी पुण्यातील नसरापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्याने तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar