Thursday, 16 Sep, 2.35 pm My महानगर

ताज्या बातम्या
NCRB Report 2020 : मेट्रो शहरांतील गुन्हेगारीत मुंबईचा देशात दुसरा क्रमांक - NCRB

मुंबई ही देशात महिलांसाठी सर्वात सुरक्षित असे शहर म्हणून समजले जाते, पण नुकत्याच गुन्हेगारीशी संबंधित समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहराचा गुन्हेगारीत दुसरा क्रमांक आढळला आहे. मुंबईत गेल्या वर्षात ४५८३ गुन्ह्याच्या घटनांची आकडेवारी समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देण्याची एकुण ४५५ प्रकरणे मुंबईत २०२० या सालात नोंदवली गेली. तर ७६९ प्रकरणे ही महिलांच्या अपहरणाशी संबंधित होती. मुंबई शहर हे गुन्हेगारीच्या बाबतीत दुसरे मेट्रोपॉलिटन शहर ठरले आहे. (Mumbai stands in second place crime against women as per National crime record bureau data 2020 )

देशातील १९ मेट्रो शहरांमध्ये सलग चौथ्या वर्षी गुन्हेगारीच्या बाबतीत मुंबई शहर हे दुसरे सर्वाधिक गुन्हेगारी असणारे शहर ठरले आहे. गुन्हेगारीच्या सर्वाधिक दराच्या बाबतीत मुंबई शहर हे नववे शहर ठरले आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीच्या दरात ३० टक्के घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारी मुंबईतील गुन्हेगारीचा दर घसरलेला आहे. पण मेट्रो शहरांच्या तुलनेत मुंबई शहराचा क्रमांक हा गुन्हेगारीत दुसरा आहे.

NCRB ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या प्रकरणात मेट्रो शहरांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो. मुंबईत २०२० मध्ये बलात्काराचे ३२२ गुन्हे घडले. तर दिल्ली आणि जयपूर ही टॉपची दोन शहरे आहेत. बलात्काराचे गुन्हे हे दिल्लीत ९६७ तर जयपूरमध्ये ४०९ इतक्या मोठ्या प्रमाणात घडले. या प्रकरणांमध्ये दोन गुन्हे असे होते की, ज्यामध्ये गॅंगरेप म्हणून गुन्ह्यांचा समावेश झाला आहे. तर १२ प्रकरणे ही हुंडाबळीची आहेत. तर ३९ प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठीची ३९ प्रकरणे नोंदवली गेली. तर ५०१ प्रकरणांमध्ये नवऱ्याकडून अत्याचार झाल्याच्या घटनांचाही समावेश आहे.

अपहरणाच्या प्रकरणांमध्ये दिल्लीनंतर मुंबईचा समावेश आहे. २०२० मध्ये मुंबईत एकुण ७६९ अपहरणाचे गुन्हे घडले. तर महिलांच्या अपमानास्पद वागणुकीचे एकुण १५०७ गुन्हे घडल्याची आकडेवारी एनसीआरबीच्या आकडेवारीत देण्यात आली आहे. महिलांचा अवैधरीत्या व्यापार करण्याच्या प्रकरणात ३७ गुन्ह्यांची नोंद आहे. तर महिलांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या विनयभंगाच्या प्रकरणी ४५५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महिलांशी संबंधित घडलेल्या सायबर क्राईमच्या बाबतीत आतापर्यंत १७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये अश्लील माहिती प्रसारीत करणे, ब्लॅकमेलिंग करणे, फॉर्मिंग आणि बदनामीसारख्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


- महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईत 'निर्भया' पथकांची स्थापना


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top