Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Oily Skin Care : तेलकट त्वचेसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक सनस्क्रीन

Oily Skin Care : तेलकट त्वचेसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक सनस्क्रीन

न्हाळा सुरू झाला की त्वचेच्या समस्या वाढू लागतात. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा काळ अधिक त्रासदायक ठरतो. घाम, अतिरिक्त तेल, चिकटपणा आणि उन्हामुळे होणारी टॅनिंग यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते.

अशावेळी सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं, मात्र बाजारातील अनेक उत्पादने महागडी असण्यासोबतच काही वेळा त्वचेला सूटही होत नाहीत. त्यामुळे आता अनेकजण नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळताना दिसत आहेत. काही सोप्या होममेड सनस्क्रीन पाहुयात

१) ग्रीन टी आणि गुलाबपाण्याचं स्प्रे सनस्क्रीन

साहित्य:
१ कप गुलाबपाणी
१ कप ग्रीन टीचं पाणी
स्प्रे बॉटल

कृती:
एका भांड्यात पाणी गरम करून त्यात २ चमचे ग्रीन टी टाका. काही मिनिटांनी ते गाळून थंड होऊ द्या. त्यात गुलाबपाणी मिसळा आणि मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण दिवसातून ४ ते ५ वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा. या स्प्रेचा फायदा म्हणजे ग्रीन टी त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देते. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देऊन फ्रेश ठेवण्यास मदत करतं.

२) एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन-ई सनस्क्रीन

साहित्य:
२ मोठे चमचे एलोवेरा जेल
२ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल

कृती:
एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल घ्या. त्यात व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधील तेल मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एका डब्यात भरून ठेवा आणि सनस्क्रीनप्रमाणे वापरा. एलोवेरा त्वचेला मॉइश्चर देतो आणि उन्हामुळे होणारी जळजळ कमी करतो. व्हिटॅमिन-ई त्वचेला डीप नरिशमेंट देऊन नैसर्गिक चमक वाढवतं.

३) चंदन तेल आणि जोजोबा ऑईल सनस्क्रीन

साहित्य
१ मोठा चमचा जोजोबा ऑईल
५ थेंब चंदनाचं तेल

कृती
दोन्ही तेल एकत्र करून काचेच्या बाटलीत भरून ठेवा. बाहेर जाण्यापूर्वी काही थेंब चेहऱ्यावर लावा. जोजोबा ऑईल त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतं. चंदन त्वचेला थंडावा देऊन टॅनिंग कमी करतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणतं.

४) आळशी जेल आणि मधाचं सनस्क्रीन

साहित्य:
१ मोठा चमचा आळशी
१ मोठा चमचा मध

कृती:
पाण्यात आळशी उकळून त्याचं जेल तयार करा. ते थंड झाल्यावर त्यात मध मिसळा. बाहेर जाण्याच्या ५ मिनिटे आधी हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.आळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील लालसरपणा आणि रॅशेस कमी करतात. मध त्वचेला मऊ ठेवून टॅनिंग कमी करण्यास मदत करतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar