Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Paper Cup Side Effects : पेपर कपमध्ये चहा पिताय? सावधान!

Paper Cup Side Effects : पेपर कपमध्ये चहा पिताय? सावधान!

फिसमध्ये असो, रेल्वे स्टेशनवर किंवा टपरीवर… गरमागरम चहा बहुतेक वेळा पेपर कपमध्येच मिळतो. अनेकांना वाटतं पेपर कप म्हणजे प्लास्टिकपेक्षा सुरक्षित पर्याय. पण तुम्हाला माहिती आहे का?

गरम चहा पिताना या पेपर कपमधून शरीरात सूक्ष्म प्लास्टिक आणि हानिकारक रसायने जाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, ही सवय दीर्घकाळ कायम राहिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

विशेष म्हणजे, अनेक पेपर कप पूर्णपणे कागदाचे नसतात. त्याच्या आतील बाजूला प्लास्टिक किंवा मेणाचा पातळ थर लावलेला असतो, जेणेकरून गरम पेयामुळे कप लगेच ओला होऊ नये. मात्र गरम चहा किंवा कॉफी त्या कपमध्ये ओतल्यानंतर हे रसायन पेयामध्ये मिसळू शकतात.

पेपर कपमुळे कोणते धोके वाढू शकतात?

1) शरीरात जाऊ शकतात मायक्रोप्लास्टिक्स
गरम चहा किंवा कॉफीमुळे कपच्या आतील प्लास्टिक लेयरमधून सूक्ष्म प्लास्टिक कण बाहेर पडतात. हे मायक्रोप्लास्टिक्स शरीरात गेल्यानंतर पचनसंस्था आणि इतर अवयवांवर परिणाम करू शकतात.

2) रसायनांचा शरीरावर परिणाम
काही पेपर कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल कोटिंगमुळे शरीरात हानिकारक घटक जाऊ शकतात. दीर्घकाळ अशा कपांचा वापर केल्यास हार्मोनल बदल, पचनाच्या समस्या आणि इतर आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात.

3) पर्यावरणालाही मोठा धोका
पेपर कप दिसायला कागदी असले तरी त्यावरील प्लास्टिक कोटिंगमुळे ते सहज रिसायकल होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा वाढतो आणि पर्यावरणावर ताण येतो.

4) गरम पेयांमुळे धोका अधिक
थंड पेयांच्या तुलनेत गरम चहा किंवा कॉफीमुळे कपमधील रसायने अधिक वेगाने बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पेपर कपमध्ये गरम पेय पिणे टाळावे, असा सल्ला आरोग्य तज्ञ् देतात.

मग काय करावे?
- शक्य असल्यास स्टील, काचेचा किंवा मातीच्या कपांचा वापर करा.
- वारंवार पेपर कपमध्ये चहा पिणे टाळा.
- खूप गरम पेय प्लास्टिक किंवा कोटेड कपमध्ये घेऊ नका.
- पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय निवडा.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक-दोन वेळा पेपर कप वापरल्याने मोठा धोका निर्माण होत नाही. मात्र रोज अनेक वेळा गरम पेय पेपर कपमध्ये घेण्याची सवय दीर्घकाळासाठी नुकसानकारक ठरू शकते. विशेषतः तरुणांमध्ये आणि ऑफिसमध्ये सतत चहा-कॉफी पिणाऱ्यांनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar