Dailyhunt
Pune Crime : आधी धमकी दिली, नंतर BJP कार्यकर्त्यांवर थेट २१ गोळ्या झाडत गेम केला, १ वर्षांपूर्वी भावाचीही हत्या

Pune Crime : आधी धमकी दिली, नंतर BJP कार्यकर्त्यांवर थेट २१ गोळ्या झाडत गेम केला, १ वर्षांपूर्वी भावाचीही हत्या

पुणे/पिंपरी-चिंचवड : तुरूंगात असलेल्या आई आणि भावाच्या जामिनाला विरोध करत असल्याच्या रागातून भाजपचे कार्यकर्ते रमेश गुरूस्वामी रेड्डी ( वय, ४२, रा. राजीव गांधी नगर, देहूरोड ) यांचा पाळत ठेवून खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

तीन महिन्यांपूर्वीच आरोपींनी रमेश रेड्डींच्या घरासमोर उभे राहून, 'आईला जामीन झाला नाही तर सर्वांना जीवे मारू', अशी धमकी दिली होती. रमेश रेड्डींवर आरोपींनी तब्बल २१ गोळ्या झाडल्या आहेत.

देहूरोड येथील संतोष स्वीट मार्टच्या पाठीमागे मंगल कार्यालयाजवळ चौकात मंगळवारी (दि. २८ ) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. मयत रमेश रेड्डी यांची बहीण शारदा रेड्डी (वय, ३९) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लखन आगळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी यांचा भाऊ विक्रम गुरूस्वामी रेड्डी याच्यावर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये साबीर समीर शेख, त्याची आई रजिया समीर शेख व त्यांचे साथीदार हे आरोपी असून ते सध्या जेलमध्ये आहेत.

मोठी बातमी! बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार, प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करणार?

तीन महिन्यांपूर्वी साबीर शेख याचा भाऊ आरोपी आफताब समीर शेख याने रमेश रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून, 'रजिया शेखला जामीन झाला नाही, तर मी रमेश रेड्डी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली होती.

मंगळवारी रात्री रमेश रेड्डी आणि त्यांचा मित्र संतोष स्वीट मार्टच्या मागील कपड्यांच्या दुकानांमध्ये कपडे घेण्यासाठी दुचाकीवर गेले होते. कपडे घेऊन दुचाकी सुरू करत असतानाच एक कार आणि दुचाकीवरून आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात पिस्तूल आणि कोयते होते. सर्व आरोपी रमेश रेड्डी यांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने धावले.

तेव्हा रमेश रेड्डी आणि त्यांच्या मित्रांनी लोकांकडे मदत मागितली, मात्र बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक भीतीने सैरावैरा पळू लागले. रमेश रेड्डी पळून जात असताना आरोपींनी मागून गोळीबार केला. तसेच त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या रमेश रेड्डी यांना तातडीने देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. पण, २१ पैकी ९ गोळ्या शरिरात घुसल्याने आणि कोयत्याचे वार झाल्याने डॉक्टरांनी रेड्डींना मृत घोषित केले.

70 ते 75 नावांमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून झीशान सिद्दिकींना विधान परिषदेवर संधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar