पुणे : शहरातील क्वीन्स गार्डन परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलमधील चॅट्स दाखवण्याची पत्नीनं मागणी पतीकडे केली. याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न तर मध्ये आलेल्या मुलालाही बेदम मारहाण केली आहे.
याप्रकरणी एका शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय पत्नीने रविवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
विजय धुलचंद कारंडे ( वय. ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे. रूपाली विजय कारंडे ( वय. ३०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे ) असं फिर्याद दाखल करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेत रूपाली कारंडे आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालेले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोदींनी जरा भान ठेवून बोललं पाहिजे, संजय राऊत कशामुळे पंतप्रधानांवर चिडले?
कारंडे हे नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असून, सध्या मुंबईतील मंत्रालयात ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि उर्जा नूतणीकरण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी ( ओएसडी ) म्हणून प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादीत दिल्यानुसार, ३ मे २०२६ रोजी हा गुन्हा दाखल झाला असून ३० एप्रिल रोजी सायंकाळी मारहाणीचा प्रकार घडला आहे. क्वीन्स गार्डन येथील निवासस्थानी पत्नी रूपाली यांनी विजय यांना मोबाईलमधील काही चॅट्सबाबत विचारणा केली आणि पासवर्ड मागितला. याकारणावरून विजय हे संतापले आणि पत्नीला बॅटने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलावरही विजय यांनी बॅटने हल्ला केला आहे. या घटनेनंतर रूपाली यांनी विजय यांना दूर ढकलेले आणि मुलासह घरातून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला. यानंतर रूपाली यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार विजय कारंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS ) कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न), ११८(१) (जाणीवपूर्वक दुखापत करणे) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
'त्याला तिथेच ठेचून मारलं पाहिजे' भोरमधील आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया, मुलगा म्हणाला, तो माझा…

