Dailyhunt
Pune Crime : 'तुम्ही तपास नीट करत नाही' शिंदेंचा OSD असल्याचे भासवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, मग.

Pune Crime : 'तुम्ही तपास नीट करत नाही' शिंदेंचा OSD असल्याचे भासवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, मग.

पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांकडून त्यांच्या खात्याच्या कामकाजासाठी ओएसडीची ( ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी ) नियुक्ती केली जाते. याच 'ओएसडी'कडून शासकीय कामकाजांत हस्तक्षेप सुद्धा केलं जात असल्याचं निदर्शनास येते.

आता असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याचे भासवून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या एका तोतयाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील ( वय ४७, रा. हिंजवडी ) असे आरोपीचे नाव आहे. पाटीलने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याची बतावणी केली. त्यानंतर पुण्यातील परिमंडल एकचे ( विश्रामबाग पोलीस ठाणे ) पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला.

ठाकरेंचे दोन खासदार अन् शिंदेच्या नेत्याची डिनर डिप्लोमसी, 'ऑपरेशन टायगर' पुन्हा सक्रिय?

"तुम्ही एका गुन्ह्याच्या तपास व्यवस्थित करत नाही" असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याचे भासवून पाटीलने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांपुढे तोतया 'ओएसडी'चा बनाव फार काळ टिकू शकला नाही. उपायुक्त रावले यांनी चक्रे फिरवत पाटीलची माहिती काढण्यास सुरूवात केली. अधिकृत पातळीवर चौकशी केल्यावर पाटील हा कोणत्याही प्रकारे उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पाटीलचा भांडाफोड झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहित सेक्शन २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने कुणाची फसवणूक केली का? याचाही शोध घेतला जात आहे.

विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपमधील नेत्यांकडून लावली जातेय 'फिल्डिंग', कोण-कोण इच्छुक?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar