Sunday, 24 Jan, 2.10 pm My महानगर

महाराष्ट्र
पुण्यात लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार

राज्यात पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार केला आहे. पुण्यासह जिल्ह्यातील सातारा, सोलापूर जिल्ह्यात एकूण ७२.७ टक्के लसीकरण झाले आहे. पुण्याचा विचार केला असता फक्त पुण्यात ६३ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे राज्यातील पुणे शहरातील लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तीन केंद्रांवरही लसीकरण मोहिमेने शंभरीचा टक्के पार केला आहे. पुण्यातील सध्या आठ केंद्रांवर लसीकरण सुरु झाले आहे. यातील पुणे महापालिकेच्या कोथरुड येथील सुतार दवाखाना, रुबी हॉल क्लिनिक, तसेच जिल्ह्यातील जुन्नर ग्रामीण रुग्णालयात १०० टक्के लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. पुणे शहरातील आठ केंद्रावर ८०० पैकी ५०२ जणांना लस देण्यात आली तर ग्रामीण भागात १५ ठिकाणाच्या १५०० पैकी ९३२ जणांना लस टोचण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात एकूण ६२ टक्के लसीकरण झाले आहे. दौड उपजिल्हात रुग्णालयात सर्वात कमी म्हणजे फक्त चार जणांनी लस घेतली आहे. त्यापाठोपाठ सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ १४ जणांनी लसीकरण केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ८०० पैकी ४१९ जणांनी लसीकरण केले. एकूण ५२ टक्के लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अश्विनी रुग्णालय, सोलापूर सरकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय केंद्रांवर १०० टक्के लसीकरण झाले. सोलापूर जिल्ह्यात १,१०० पैकी १,०८२ पैकी ९८ टक्के लसीकरण केले. पुणे विभागात पाच हजार १०० पैकी तीन हजार ७०७ जणांनी लसीकरण केल्याने ७२.७ टक्के लसीकरण केले आहे, साताऱ्यात ९०० लाभार्थ्यांपैकी ७७२ जणांनी लस घेतली आहे.त्यामुळे साताऱ्यात ८६ लसीकरण झाले आहे. तर सातारा जिल्हा रुग्णालयात १५८ कर्मचाख्यांनी लस घेतली. त्याप्रमाणे कराड उपजिल्हा रुग्णालयात १५३ जणांनी तर वाईच्या मिशन रुग्णालयात १०३ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. त्या केंद्रांवर १०० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाल्याची नोंद झाली. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे राज्याचा एकंदरीत लसीकरणाचा विचार केला असता पुण्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. राज्यात शनिवारी २९० केंद्रांवर २४ हजार २८२ (८३ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वांत जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत एकूण ९९ हजार २४२ जणांचे लसीकरण झाले आहे.


-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top