Saturday, 23 Jan, 8.11 pm My महानगर

महामुंबई
राज्यात २,६९७ नवे रुग्ण, ५६ जणांचा मृत्यू

राज्यात २,६९७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,०६,३५४ झाली आहे. राज्यात ४३,८७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,७४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १०, उल्हासनगर मनपा ६, नंदुरबार ४, पुणे १०, सोलापूर ४, सातारा ५, नागपूर ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५६ मृत्यूंपैकी ४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू पुणे ४, सातारा २ आणि नागपूर १ असे आहेत.

आज ३,६९४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,१०,५२१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०६,३५४ (१४.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१३,६७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top