Dailyhunt
Riyan Parag : ई-सिगारेट ओढणे पडले महागात, BCCI ने ठोठावला इतक्या लाखांचा दंड

Riyan Parag : ई-सिगारेट ओढणे पडले महागात, BCCI ने ठोठावला इतक्या लाखांचा दंड

वी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार रियान पराग आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (vaping) ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट नोंदवण्यात असल्याची माहिती आता समोर आली आहे.

आयपीएल 2026 च्या 40व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरू होता. दुसऱ्या डावादरम्यान रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट वापरताना दिसला. रियानला आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-1 च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. ही कृती खेळाची प्रतिष्ठा मलीन करणारी मानली जात आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. आयपीएलने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रियान परागने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात तो ड्रेसिंग रूममध्ये 'व्हेप' वापरताना दिसल्याने ही कारवाई करण्यात आली. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने आपली चूक मान्य केली आहे. त्याने सामना पंच अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. रियान परागने ई-सिगारेट पिणे चुकीचे मानले गेले. भारत सरकारने ई-सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 (PECA) अंतर्गत व्हेप्स आणि ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्री, आयात आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे. उल्लंघनावर दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा परिस्थितीत, एका उच्चभ्रू खेळाडूने आणि संघाच्या कर्णधाराने सार्वजनिक व्यासपीठावर याचा वापर करणे हे कायद्याचे आणि खेळाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन मानले गेले आहे.

राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा वादात

आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ वादात सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर डगआउटमध्ये मोबाईल वापरताना पकडले गेले होते. त्याला 'खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्र' म्हणजेच PMOA चे उल्लंघन मानले गेले होते. त्या प्रकरणात बीसीसीआयने चौकशीनंतर व्यवस्थापकावर दंड ठोठावला होता आणि त्यांना ताकीद दिली होती. आता कर्णधाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संघाच्या अडचणी वाढू शकतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar