Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rosemary : केसांना जीवनदान देणारी रोझमेरी, वाचा वापरायची कशी?

Rosemary : केसांना जीवनदान देणारी रोझमेरी, वाचा वापरायची कशी?

रोझमेरी (Rosemary) ही औषधी वनस्पती आहे. तिला एक वेगळा सुगंध देखील असतो. शतकानुशतके रोझमेरीचा वापर अन्न आणि पारंपरिक औषधोपचारांमध्ये करण्यात आला आहे. रोझमेरी स्वयंपाकासह सौंदर्य आणि केसांच्या निगेसाठी प्रसिद्ध आहे.

यात दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांच्या अनेक तक्रारींपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. आजच्या लेखात आपण केसांना रोझमेरी कशा पद्धतीने जीवनदान देऊ शकते याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

केसांची वाढ -

रोझमेरीमुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारू शकते. रक्ताभिसरण सुधारल्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचते आणि केसांची जलदगतीने वाढ होते.

कोंड्यावर प्रभावी -

रोझमेरीतील एँटीऑक्सिंडट्स आणि एँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे टाळू स्वच्छ राहतो आणि कोंड्याची समस्या कमी होण्यास सुरूवात होते.

हेअर फॉलवर उपयुक्त -

रोझमेरीतील एँटीऑक्सिंडट्स केसांच्या मुळांचे रक्षण करून केस पातळ होणे आणि तुटणे कमी करते.

केसांना बळकटी -

रोझमेरीतील पोषणमूल्य केसांच्या मुळांना बळकटी देतात आणि केसगळती कमी करतात.

नैसर्गिक चमक -

नियमित केसांना रोझमेरी तेल लावल्यास केस मऊ आणि चमकदार होतात.

अकाली पांढरे केस रोखते -

रोझमेरीतील रंगद्रव्य आणि एँटीऑक्सिंडट्स केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावतात.

खाज कमी होते -

रोझमेरीत थंडावा देणारे आणि सूज कमी करणारे घटक टाळूतील खाज, कोरडेपणा कमी करतात.

रोझमेरी केसांसाठी कशी वापराल?

तेल -

रोझमेरीचे तेल केसांसाठी वापरता येईल. तेलाच्या मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारेल.

हेअर स्प्रे -

रोझमेरीची हेअर स्प्रे बनवण्यासाठी ताजी किंवा वाळलेली रोझमेरी पाने पाण्यात 10 मिनिटे उकळवून घ्यावीत. थंड झाल्यावर हे पाणी गाळून स्प्रे बाटलीत भरावे. हे पाणी केसांवर दररोज स्प्रे करावे.

शाम्पू -

तुमच्या रोजच्या वापरातील शाम्पूमध्ये रोझमेरीचे पाणी मिक्स करून सुद्धा वापरता येईल.

महत्त्वाची टीप -

रोझमेरी इसेन्शियल ऑइल थेट टाळूवर लावू नये, नेहमी खोबरेल तेल किंवा इतर तेलात मिसळून लावावे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar