Tuesday, 22 Sep, 11.32 pm My महानगर

क्रीडा
RR vs CSK Live Update : चेन्नईला पराभूत करत राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी

संजू सॅमसनची झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली स्टिव्ह स्मिथची साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला १६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १३ व्या मोसमातील विजयी सलामी नोंदवली आहे.


चेन्नईला चौथा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड भपळाही न फोडता तंबुत परता. राजस्थानचा फिरकीपटू राहुल तेवातीयाच्या फिरकीपुढे चेन्नईचे खेळाडू हतबल झाले आहेत. राहुल तेवातीयाने चेन्नईचे तीन गडी बाद केले आहेत. चेन्नईचे ११ षटकांत ८६ धावांवर ४ गडी बाद झाले आहेत.


राजस्थानने चेन्नईपुढे सामना जिंकण्यासाठी २१७ धावांचे आव्हान ठेवले.


राजस्थानचा कर्णधार स्मिथला सॅम करनने बाद केले. स्मिथने ४७ चेंडूत ६९ धावांची खेळी केली.


राजस्थानची १ बाद १३२ वरून ७ बाद १७८ अशी अवस्था झाली. त्यांनी ४६ धावांत ६ विकेट गमावल्या.


राजस्थानला सॅमसन आणि स्मिथ यांनी अप्रतिम सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही.


डेविड मिलरला खातेही उघडता आले नाही. तो धावचीत झाल्याने राजस्थानला तिसरा धक्का बसला.


तुफान फटकेबाजीनंतर सॅमसनला लुंगी इंगिडीने केले बाद. सॅमसनने ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ षटकारांचा समावेश होता.


सॅमसनने फटकेबाजी करत अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.


स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सावरला.


आयपीएलमध्ये पदार्पण करणारा राजस्थान रॉयल्सचा मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालला आपली छाप पाडता आली नाही. दीपक चहरने त्याला ६ धावांवर बाद केले.


अंबाती रायडू सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ७१ धावांची खेळी केली होती. मात्र, तो पूर्णपणे फिट नसल्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे.


चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.


चेन्नईचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा, तर राजस्थानचा पहिलाच सामना आहे.


आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top