Friday, 27 Nov, 1.41 pm My महानगर

ताज्या बातम्या
सहा गर्भवती महिलांच्या बाळाचा एकच बाप; एकाचवेळी राहिल्या गरोदर

आफ्रिका खंडात एक अजब घटना समोर आली आहे. ती म्हणजे एकाच तरुणापासून सहा महिला गर्भवती राहिल्या असल्याचे समोर आले असून या सर्व महिलांच्या बाळाचा बाप एकच असल्याचे त्या तरुणाने सांगितले आहे. सध्या या व्यक्तीचीच चर्चा सुरु असून प्रीटी माईक असे या तरुणाचे नाव आहे.

मित्राच्या लग्नात प्ले बॉयचीच हवा!

नायजेरिया हा देश नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो. पण, सध्या या देशाची चर्चा एका भलत्याच कारणासाठी होत आहे. ही चर्चा होत आहे ती म्हणजे प्ले बॉयचीच. प्ले बॉय म्हणजे प्रीटी माईक हा नुकताच मित्राच्या लग्नात पाहुणा म्हणून गेला होता. पण, जाताना त्याच्यासोबत सहा गर्भवती महिला होत्या. या सगळ्या महिलांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. प्रीटी स्वत:देखील नटून थटून या समारंभात आला होता. तो लग्न समारंभात आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या सहा गर्भवती महिलांमुळे एकच चर्चा सुरु झाली. या सहाही महिला तुमच्याच पत्नी आहे का?, असे विचारल्यानंतर हो असे त्यांनी उत्तर दिले. तसेच या सर्व महिलांच्या बाळाचा बाप देखील मीच असल्याचे देखील त्यावेळी त्यांनी सांगितले.

एकाच मंडपात विवाह

या सहाही महिला प्रीटीच्या पत्नी आहेत. प्रीटीने गेल्या वर्षी त्या सहाही जणींशी एकाच दिवशी एकाच मंडपात लग्न केले होते. या सहाजणींपैकी दोघी त्याच्या माजी प्रेयसी असून उर्वरित चौघींशी त्याचे प्रेमसंबंध होते. आता तो सहा बाळांचा बाप बनणार आहे. विशेष म्हणजे चर्चेत यायची प्रीटीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २०१७ मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणावरुन देखील त्याला अटक करण्यात आली होती.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top