Thursday, 16 Sep, 5.10 pm My महानगर

महाराष्ट्र
संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे संकेत; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.

संभाजी ब्रिगेडने भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहेत. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मासिकात लिहिलेल्या लेखात आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युतीतत हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा निर्णय घेतला जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुरुषोत्तम खेडेकर यांनी 'मराठा मार्ग' या मासिकाच्या संपादकीयमध्ये लेख लिहिला आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुरुषोत्तम खेडेकर यांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रवीण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडचं केलं स्वागत

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. संभाजी ब्रिगेडने असं वक्तव्य केलं असेल तर त्याचं स्वागतच आहे. महाविकास आघाडी सरकारला आरक्षण राखता आलेलं नाही, हे मराठा समाजातील लोकांना समजलं आहे, असं दरेकर म्हणाले.

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लेखात नेमकं काय?

पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहला असून या लेखात त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्याचे विधान केले आहे. महाआघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीनही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा आणि कामाचा एकतर्फी लाभ घेणं आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत. भाजपा सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे ही या तीनही पक्षांची मानसिकता आहे. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगडेला खूप मर्यादा आहे. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो, असं खेडेकर यांनी मराठा मार्ग या लेखात म्हटलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top