बारामती : दिवंगत अजित पवार यांच्या निधानानंतर झालेल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज ( ४ मे ) जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या निकालानुसार सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
एकतर्फी सुनेत्रा पवारांचा विजय होताना दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार पहिल्या सहा राउंडमध्ये सुनेत्रा पवारांना ५३ हजार ४७८ मते पडली आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या पत्नी करूणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. यातच सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.
PM मोदींनी झालमुरी भेळ खाल्लेल्या मतदारसंघात BJP की TMC, कोण आघाडीवर?
सोशल मीडियावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते."
"आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया," असे सुनेत्रा पवारांनी म्हटलं.
"दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!," असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे.
बंगालमध्ये BJP अन् तामिळनाडूत TVK आघाडीवर; TMC, DMK ला धक्का, राऊतांची प्रतिक्रिया काय?

