Dailyhunt
Sunscreen लावूनही त्वचा काळवंडते? या चुका ठरतात कारणीभूत

Sunscreen लावूनही त्वचा काळवंडते? या चुका ठरतात कारणीभूत

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेत वाढ होत आहे. प्रखर उन्हामुळे टॅनिंग होऊ नये यासाठी बऱ्याचजणांनी सनस्क्रीन लावण्यास सुरूवात केली आहे. परंतू, नियमित सनस्क्रीन वापरूनही अनेकांना टॅनिंगची समस्या जाणवत आहे.

अशावेळी त्वचारोगतज्ज्ञांच्या मते सनस्क्रीन लावताना काही क्षुल्लक चूका घडतात, ज्यामुळे टॅनिंग होते. आजच्या लेखात आपण या चुका जाणून घेणार आहोत.

कमी प्रमाणात सनस्क्रीनचा वापर

सनस्क्रीन लावताना एक गोष्ट लक्षात घ्यावी, घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी १५ मिनिटे आधी तरी सनस्क्रिन लावावी.

ढगाळ वातावरणात न वापरणे

बहुतांशजण ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास सनस्क्रिन लावणे टाळतात. तज्ज्ञांच्या मते, जरी ढगाळ वातावरण झाले असले तरीही सुर्याच्या हानिकारक किरणांचा प्रभाव वातावरणात राहतो. त्यामुळे सनस्क्रिन लावावी.

SPFकडे दुर्लक्ष

सनस्क्रिन खरेदी करण्यापूर्वी त्याचा SPF30 किंवा त्यापेक्षा अधिक असावा याची खात्री करावी. एसपीएफचा आकडा जेवढा जास्त तेवढाच तुमच्या त्वचेसाठी ते योग्य असते.

योग्य पद्धतीने न वापरणे

सनस्क्रिन ही तुम्ही योग्य पद्धतीने लावली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास सनस्क्रीन लावूनही फायदा होत नाही.

दिवसातून एकदाच लावणे

जर तुम्ही दिवसभर जास्त वेळ उन्हात फिरत असाल तर तुम्ही दर दोन तासांनी सनस्क्रीनचा वापर करायला हवा. याशिवाय जेव्हा तुम्ही स्विमिंग करता तेव्हा सुद्धा याचा वापर करणे गरजेचे आहे.

सनस्क्रीन लावणे गरजेचे का?

सनस्क्रिन न लावणे हे त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. सुर्याच्या किरणांमधून निघणारी हानिकारक किरणे स्किन सेल्सचा डॅमेज करतात. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता असते. तसेच तुम्ही जर सातत्याने हानिकारक किरणांच्या संपर्कात आलात तर स्किन कँन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सनस्क्रीनत्वचेवर लावणे पुरेसे नाही तर योग्य पद्धतीने सुद्धा लावणे गरजेचे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar