Wednesday, 15 Sep, 3.27 pm My महानगर

ताज्या बातम्या
Terrorist Attack: कोणी शेतकरी तर कोणी MBA होल्डर, वाचा दहशतवाद्यांची प्रोफाईल

दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेलने मंगळवारी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या दोन दहशतवाद्यांचे नाव ओसामा आणि दुसरा जीशान कमर असे आहे. याशिवाय अटक केलेल्या चार इतर आरोपींची नाव मोहम्मद अबु बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद आमिर जावेद आणि मूलचंद लाला असे आहे. यामधील चार जणांना उशीरा रात्री कोर्टात हजर केले होते. तसेच आज दोन जणांना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. रात्री कोर्टासमोर हजर केलेल्या चार दहशतवाद्यांना १४ दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे. सणासुदीच्या दिवसात हल्ला करणाचा या दहशतवाद्यांचा कट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या दशतवाद्यांमध्ये कोणी शेतकरी, तर कोणी एमबीए होल्डर असल्याचे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या प्रोफाईलचा शोध लावला आहे. उत्तर प्रदेशात अटक केलेल्या जीशानने एमबीए केले आहे. जीशानने दुबईमध्ये अकाउंटेंट म्हणून काम केले आहे. परंतु लॉकडाऊन दरम्यान तो भारतात आला होता. यादरम्यान त्यांनी खजूर विकण्याचा धंदा लावला. लखनऊ मधून अटक करण्यात आलेला आमिर, जीशानचा नातेवाईक आहे. आमिर बरेच वर्ष जेद्दामध्ये होता. तिथे धार्मिक शिक्षण देत होता. तसेच जान मोहम्मद हा एक ड्रायव्हर होता. २००१मध्ये एका हल्ल्याच्या प्रकरणात जानला अटक करण्यात आली होती. तसेच जानचे डी कंपनीशी संबंध असल्याचे देखील म्हटले जात आहे. चौथा मूलचंद ऊर्फ लाला एक शेतकरी होता.

पाचवा दहशतवादी अबू बकर हा देखील जेद्दामध्ये राहिला आहे. परंतु नंतर भारतात आला आणि २०१३मध्ये त्याने देवबंद येथील मदरशात शिक्षण घेतले. दिल्लीमध्ये अटक करण्यात आलेला ओसामाचे कुटुंब सुक्या मेवासंबंधित काम करतात. यामुळेच ओसामा मध्य पूर्व देशांमध्ये काही वेळा व्यापारामुळे जात होता. याद्वारे ओसामा मस्कट गेला आणि नंतर जलमार्गाने पाकिस्तानला पोहोचला.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top