Dailyhunt
US Iran War : ट्रम्प म्हणाले एका रात्रीत संपवू, इराण म्हणाले नुसतं धमकीने युद्ध थांबणार नाही.

US Iran War : ट्रम्प म्हणाले एका रात्रीत संपवू, इराण म्हणाले नुसतं धमकीने युद्ध थांबणार नाही.

वी दिल्ली : गेली 38 दिवस अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. अद्यापही दोन्ही बाजूने हल्ले असून होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून गदारोळ सुरूच आहे. असे असताना पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे.

अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवते, असे म्हणत त्यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. त्यावर इराणनेही प्रत्यत्तर देत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने हे युद्ध संपणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काय म्हणाले ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत इराणला अल्टीमेटम दिला आहे. "अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवते. अमेरिका फक्त एका रात्रीत संपूर्ण इराणला उद्ध्वस्त करू शकते आणि ती रात्र कदाचित उद्याची रात्रही असू शकते." अशी थेट धमकी दिली आहे. तसेच, यावेळी अमेरिकन सैन्याच्या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशनचाही खुलासा केला. इराणच्या हद्दीत कोसळलेल्या अमेरिकन पायलटला वाचवण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे बचाव अभियान राबवण्यात आले असल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहितीनुसार, "या धाडसी मोहिमेत सुमारे 200 सैनिक आणि 21 विमाने तैनात करण्यात आली होती. अत्यंत धोकादायक परिस्थितीत हा पायलट सुरक्षित बाहेर काढण्यात आला. ऑपरेशनदरम्यान अमेरिकन विमानांवर जवळून गोळीबारही करण्यात आला. पण, तरीही सैनिकांनी धैर्याने मिशन पूर्ण केले. या कारवाईत अमेरिकन सैन्याने आपले एक विमान स्वतःच नष्ट केला." असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

काय म्हणाले इराण?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर इराणने प्रत्युत्तर देत त्यांच्या धमक्यांचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले. इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, आयआरजीसीने (Islamic Revolutionary Guard Corps) अमेरिकेच्या अध्यक्षांची विधाने निराधार असल्याचे म्हटले. इराणच्या लष्कराने म्हटले की, ट्रम्प यांच्या धमक्यांचा अमेरिकन आणि इस्रायली सुरक्षा दलांविरुद्ध सुरू असलेल्या आक्रमणावर परिणाम होणार नाही. इराणच्या मते, या धमक्यांमुळे पश्चिम आशियामध्ये अमेरिकेला झालेला अपमान पुसला जाणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar