Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vaibhav Suryavanshi : पुन्हा शतक हुकले, पण वैभव सूर्यवंशीचे अनेक विक्रम केले नावावर

Vaibhav Suryavanshi : पुन्हा शतक हुकले, पण वैभव सूर्यवंशीचे अनेक विक्रम केले नावावर

वी दिल्ली : अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 च्या सामन्यात आपली छाप पाडताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या खेळाडूने मागील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूंत 5 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 97 धावांची तुफानी खेळी केली होती.

महत्त्वाचे म्हणजे वैभव सूर्यवंशीला गेल्या सामन्यात दिग्गज ख्रिस गेलच्या आयपीएलमधील वेगवान शतकाचा विक्रम मोडण्याची संधी होती, मात्र तो बाद झाला. यानंतर आज (29 मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने शानदार खेळी केली. वैभवने 47 चेंडूंमध्ये 8 टौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावा काढून बाद झाला आणि पुन्हा एकदा शतक करण्याची संधी गमावली. असे असले तरी त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राजस्थानची सुरुवात खराब झाली. अवघ्या 9 धावांवर संघाने आपल्या दोन विकेट गमावल्या होत्या. राजस्थान संघ अडचणीत असतानाच वैभव सूर्यवंशीने संथ फलंदाजी करत सुरुवातीला 700 धावांचा टप्पा पूर्ण केला. यासह आयपीएलच्या यंदाच्या सर्वाधिक धावा करणारा वैभव सूर्यवंशी प्रथम क्रमाकांचा फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी केवळ दोन 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या) फलंदाजांनी एकाच हंगामात 600 धावांचा टप्पा ओलांडला होता, मात्र आता वयाच्या 15 व्या वर्षीच 'नॉकआउट' सामन्यात वैभव सूर्यवंशीने ही कामगिरी केली आहे.

पॉवरप्लेमध्ये 500 धावा करणार पहिला फलंदाज

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने पॉवरप्ले दरम्यान 500 धावा पूर्ण केल्या आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेच्या टप्प्यात त्याने 17 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या. एकाच आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये 500 धावा करणारा वैभव हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2026 मधील आपली 16 व्या डावाची खेळी खेळताना वैभवने पॉवरप्लेमध्ये एकूण 502 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राईक रेट 232 इतका राहिला आहे. पॉवरप्ले दरम्यान वैभव सहा वेळा बाद झाला आहे. आपल्या 502 धावांपैकी वैभवने 452 धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून केल्या आहेत. पॉवरप्ले दरम्यान त्याच्या बॅटमधून 47 चौकार आणि 44 षटकार निघाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे याआधी एकाच आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना डेव्हिड वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये 467 धावा केल्या होत्या. तर भारतीय फलंदाजांमध्ये 2025 मध्ये साई सुदर्शनने पॉवरप्लेमध्ये 402 धावा केल्या होत्या.

वेगवान 1000 धावा करणार सूर्यवंशी दुसरा फलंदाज

वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये आपल्या वेगवान 1000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत खेळलेल्या डावांचा विचार करता संयुक्तरित्या वेगवान 1,000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. वैभवने आयपीएलच्या इतिहासात केवळ 23 डावांमध्येच 1,000 धावांचा टप्पा गाठला आहे. लेंडल सिमन्सने देखील आयपीएलच्या 23 डावांमध्ये 1,000 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जलद 1,000 धावा करण्याचा विक्रम शॉन मार्शच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम 21 डावांमध्ये साध्य केला होता. दरम्यान, आयपीएलमध्ये मध्ये 1,000 धावा पूर्ण करणारा वैभव हा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. असे करताना त्याने साई सुदर्शनला मागे टाकले आहे. साई सुदर्शनने 25 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar