Friday, 27 Nov, 2.01 pm My महानगर

ताज्या बातम्या
Video: लग्नात एका महिलेनं असं काही गिफ्ट दिलं जे पाहून नवरा हडबडला!

लग्न म्हटलं की एक थाटामाटात सोहळा आलाचं. या सोहळ्यात नातेवाईक नववधू आणि नवदेवासाठी खास भेटवस्तू देतात. सध्या एका लग्न समारंभातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या लग्नात एका महिलेनं नवऱ्याला असं काही गिफ्ट दिलं जे पाहून नवराच हडबडला आहे. लग्नात एका महिलेनं नवऱ्याला कोणती वस्तू किंवा पैशाचं पकिटं न देता तिने एके ४७ रायफल (AK-47 rifle) दिली आहे.

या लग्न समारंभातील व्हिडिओ आदिल अहसान (Adeel ahsan) नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नववधू एका सोफ्यावर बसले आहेत. यादरम्यान एक महिला स्टेजवर येते आणि ती नवरदेवाला एके ४७ रायफल देते. हे गिफ्ट पाहून नवरा आश्चर्यचकीत होत असला तरी त्याने ते गिफ्ट स्वीकारलं आहे. त्यानंतर महिलेनं नवविवाहित जोडप्यासोबत एका फोटो काढताना दिसत आहे.

माहितीनुसार, हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. तसेच व्हिडिओवर नेटकरी खूप साऱ्या प्रतिक्रिया करत आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडिओ..


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top