Wednesday, 15 Sep, 7.40 pm My महानगर

क्रीडा
विराट जुन्या फॉर्ममध्ये आल्यास ट्रिपल सेंच्यूरी करेल - कपिल देव

विराट कोहलीच्या फॉर्मची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. एकेकाळी सहज शतक ठोकणाऱ्या विराटला गेल्या दोन वर्षांमध्ये एकही सेंच्यूरी करता आलेली नाही. गेल्या काही सामन्यात विराटने अर्धशतकापर्यंत मजल मारली आहे खरी, पण शतकाचे स्वप्न मात्र अपुर्णच राहिले आहे. विराटच्या सध्याच्या फॉर्मची तुलना ही भारतीय संघाच्या कॅप्टन पदाशी केली जात आहे. संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा परिणाम हा विराटच्या फॉर्मवर होत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाचा अतिरिक्त ताण हा फॉर्मसाठी कारणीभूत असल्याचा तर्क सध्या लढवला जात आहे. पण भारतीय संघाचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी या सर्व तर्क वितर्कांना आणि शक्यतांना फेटाळले आहे.

जर संघाच्या नेतृत्वाचा दबाव असता, तर विराटनेही ५५०० धावा अवघ्या ६५ कसोटी सामन्यात केल्या नसत्या. या कसोटी सामन्यांमध्ये २० शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय सामन्यात २१ शतके आणि २७ अर्धशतके करत विराटने ५५०० धावा अवघ्या ९५ सामन्यांमध्ये केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये जेव्हा कोहली चांगल्या धावा करत होता, तेव्हा कोणीच त्याच्या फॉर्म आणि बॅटिंगबद्दल बोलत नव्हते. पण एकाएकीच त्याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच. त्यामुळे जेव्हा विराट शतक आणि द्विशतके केली तेव्हा हा सगळा चांगला अनुभव नव्हता का ? असाही सवाल कपिल देव यांनी केला आहे. त्यामुळे विराटचा फोकस हा केवळ संघाचे नेतृत्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुलनेत त्याची क्षमता ओळखणे गरजेचे असल्याचे कपिल देव म्हणाले.

एकदा विराटचा फॉर्म परत आला की शतक करणे ही कोहलीसाठी मोठी गोष्ट नसेल. कोहलीचा कसोटीतला सर्वोत्तम धावांचा विक्रम हा २५४ धावांचा आहे. पण कोहलीकडे इतक्यावर समाधानी न राहता ट्रिपल सेंच्यूरी करण्याचीही क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत फक्त दोन भारतीयांना ही कामगिरी करता आली आहे. त्यामुळे कामगिरीची आलेख हा चढता उतरता राहील. पण हे जास्तकाळ राहणार नाही. एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात २८ ते ३२ हा कालावधी असा असतो की ज्यावेळी खेळाडूची खरी प्रतिभा खुलायला सुरूवात होते. त्यावेळीच खेळाडू हा खऱ्या अर्थाने प्रगल्भ आणि अनुभवी झालेला असतो. म्हणूनच कोहली जुन्या फॉर्ममध्ये आल्यास त्याच्यासाठी नवे विक्रम करणे ही अशक्यप्राय अशी गोष्ट नसेल असेही ते म्हणाले. कोहलीकडे कोणत्याही प्रकारची फिटनेसची कमतरता नाही. त्यामुळे कोहलीने फक्त थोडीशी वेळ ओळखून मोठ्या धाव्या कराव्यात अशी अपेक्षा कपिल देव यांनी व्यक्त केली आहे.


- T20 World cup : धोनीचा मिडास टच भारतीय संघासाठी लकी ठरेल - फारूख इंजिनिअर


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top