Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
West Bengal Election Result : PM मोदींनी झालमुरी भेळ खाल्लेल्या मतदारसंघात BJP की TMC, कोण आघाडीवर?

West Bengal Election Result : PM मोदींनी झालमुरी भेळ खाल्लेल्या मतदारसंघात BJP की TMC, कोण आघाडीवर?

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसमध्ये 'टफ फाइट' बघायला मिळत आहे. सगळ्यांचे लक्ष भवानीपूरच्या जागेवर लागलं आहे. तिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदु अधिकारी यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

सध्या ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. परंतु, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुरी खाल्ली होती, तिथे काय परिस्थिती आहे? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदी हे झारग्राम विधानसभा मतदारसंघात पोहोचले होते. तिथे पंतप्रधान मोदींचा ताफा एका छोट्याशा दुकानात येऊन थांबला होता. पंतप्रधान मोदी गाडीतून उतरले आणि झालमुरीच्या दुकानात गेले. तिथे त्यांनी झालमुरी भेळ विकत घेतली होती. तसेच, तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांसह झालमुरी भेळचा आस्वाद घेतला होता.

किंगमेकर की किंग? तामिळनाडूमध्ये थलपथी विजयचा प्रस्थापितांना धक्का

याच झालमुरी मतदारसंघात भाजपचे लक्ष्मी कांता साऊ आणि तृणमूल काँग्रसचे मोंगल सरेन यांच्यात लढत होत आहे. २१ पैकी पहिल्या सहा राउंडनुसार भाजपचे लक्ष्मी कांता साऊ हे आघाडीवर असताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे मोंगल सरेन हे ९ हजार मतांच्या आसपास पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळतंय.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लागला असून दिसत आहे. पहिल्यांदाच 'कमळ' फुलताना दिसत आहे. भाजप सध्या ११७ जागांवर आघाडीवर आहे. तर, तृणमूल ७० जागांवर थांबल्याचं पाहायला मिळत आहे.

बंगालमध्ये BJP अन् तामिळनाडूत TVK आघाडीवर; TMC, DMK ला धक्का, राऊतांची प्रतिक्रिया काय?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar