Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
World Earth Day 2026 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरूवात कशी झाली?

World Earth Day 2026 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरूवात कशी झाली?

रवर्षी जगभरामध्ये 22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिन' साजरा केला जातो. पर्यावरण जनजागृतीसाठी हा दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याचीच आठवण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जागतिक वसुंधरा दिनी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा केली जाते. याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि विविध सामाजिक संस्थाकडून जनजागृती करण्यात येते. तसेच या दिवशी झाडे लावणे, रस्त्यावरील कचरा गोळा करून स्वच्छता राखणे, जनतेमध्ये शाश्वत आयुष्य जगण्याचे मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात येतो.

वसुंधरा दिनाची सुरूवात कशी झाली?

अमेरिकेतले पर्यावरणवादी आणि खासदार म्हणजेच सिनेटक गेलार्ड नेल्सन आणि हार्वड विद्यापीठात शिकणाऱ्या डेनिस हेन्स यांनी मिळून 1970 मध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिन साजरा केला. हा दिन जागतिक स्तरावर 192 देशांद्वारे साजरा केला जातो. 60-70 च्या दशकात जंगले आणि झाडांची अंदाधुंद कत्तल पाहता, सप्टेंबर 1969 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन येथे एका परिषदेत विस्कॉन्सिनचे अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. या देशव्यापी जनआंदोलनात अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या परिषदेत जवळपास 20 हजारांहून अधिक जनता सहभागी झाली होती. . तेव्हापासून हा दिन सातत्याने साजरा केला जातो.

वसुधंरा दिनाची थीम -

दरवर्षी या दिनासाठी एक खास थीम निश्चित करण्यात येते. या वर्षी जागतिक वसुंधरा दिन 2026 ची 'आमची शक्ती, आमचा ग्रह' (Our Power, Our Planet) अशी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar