Dailyhunt
Yugendra Pawar : सुनेत्रा पवारांचे नेतृत्त्व मान्य करणार का? युगेंद्र पवार म्हणाले, 'शरद पवार अन् सुप्रियाताई.'

Yugendra Pawar : सुनेत्रा पवारांचे नेतृत्त्व मान्य करणार का? युगेंद्र पवार म्हणाले, 'शरद पवार अन् सुप्रियाताई.'

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक लागले आहे. पण, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आहेत.

त्यामुळे एकत्र येणार यायचं असेल तर सुनेत्रा पवार यांचे नेतृत्त्व मान्य करणार का? असा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, युगेंद्र पवार यांनी भाष्य केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

युगेंद्र पवार म्हणाले, "आम्ही छोटे कार्यकर्ते पडतो. नेतृत्त्व कोण करणार, हे सुनेत्रा पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते बसून ठरवतील."

'तुम्ही तपास नीट करत नाही' शिंदेंचा OSD असल्याचे भासवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, मग…

"राहुरीची पोटनिवडणूक लढायची की नाही, याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करतील," अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर युगेंद्र पवार म्हणाले, "शेवटी निवडणूक लढण्याचा अधिकार लोकशाहीत सगळ्यांना आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. तीच श्रद्धांजली अजितदादांना असणार आहे. आम्ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करू. त्या निवडून येण्यासाठी प्रयत्न करू. १०० टक्के सुनेत्रा पवारच निवडून येणार आहेत, याची खात्री आम्हाला आहे."

सुनील तटकरेंनी आधी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल आधी 'मला माहिती नाही' आणि आता 'मला माहिती होती' असे वक्तव्य केले आहे. त्याबाबत प्रश्न विचाल्यावर युगेंद्र पवार यांनी म्हटलं, " दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. एकत्र आल्यात जमा होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही एकत्र लढलो. अनेक बैठक झाल्या. शरद पवार, जयंत पाटील आणि अजितदादांची एकत्र बैठक झाल्या होत्या. सगळ्यांची इच्छा आहे की राष्ट्रवादी कुटुंब एकत्र आले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक पावले टाकत राहू. तटकरेंनी कुठल्या वेळेला काय बोलायचे, हा त्यांचा प्रश्न आहे."

पटेल आणि तटकरेंना वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी; पार्थ पवारांकडून तीव्र शब्दांत निषेध

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar