Sunday, 24 Jan, 9.11 pm माय महाराष्ट्र न्यूज

होम
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे वाढले इतके रुग्ण

माय महाराष्ट्र न्यूज टिम :अहमदनगर जिल्ह्यात आज ८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ५६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटीजेन चाचणीत १४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०५, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहता ०३ आणि राहुरी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ११, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता ०४, राहुरी ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०४, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहता ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा २९, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०३, नगर ग्रामीण २०, नेवासा ०२, पारनेर ०५, पाथर्डी ०४, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:६९५६०

उपचार सुरू असलेले रूग्ण: ९१४

मृत्यू:१०९०

एकूण रूग्ण संख्या:७१५६४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Maharashtra News
Top