Tuesday, 07 Jul, 7.12 pm माय महाराष्ट्र न्यूज

होम
भेंडा येथे रोड रॉबरी. पिकअप चालकाला 2 लाखाला लुटले

भेंडा प्रतिनिधी :- तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून 2 लाख रुपयांची लूट केल्याची फिर्याद चालक हरिदया सोपान आहेर रा.रामज पिंपळस,ता.निफाड याने नेवासा पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिस उपधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे,गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

महिंद्रा बोलेरो पीक क्रमांक एम एच 15 पीव्ही 2680 या वहानाचा चालक लातूर हुन नाशिक कडे जात असताना नेवासा तालुक्यातील भेंडा ब्रूद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासा-शेवगाव मुख्य रडत्यावर आज मंगळवारी (दि 7 रोजी) दुपारी तीन ते साडे तिच्या सुमारास पिकअपला अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी घालून पिकअप थांबवून चालकाकडील रोख 2 लाख रुपये व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायन केले आहे.आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.खरोखरच लूट झाली की लुटीचा बनाव निर्माण केला याचा ही तपास पोलिस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Maharashtra News
Top