Thursday, 21 Jan, 3.10 pm माय महाराष्ट्र न्यूज

होम
मोठी बातमी: या टप्प्यात मोदी आणि केंद्रीय मंत्रीही लस घेणार; केंद्राचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज टिम :केंद्र सरकारने आज अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झालं आहे. यावेळी कोरोना काळात दिवस रात्र जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली. पहिल्या टप्प्यात सुमारे 7 लाख आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यात लष्कर, अर्धसैनिक दलाचे जवानांनाही लस देण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात पन्नाशीच्या पुढच्या नागरिकांसह पंतप्रधानांसह, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे राज्यपाल आणि बहुतेक राज्यांचे मुख्यमंत्री लस टोचून घेणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Maharashtra News
Top