Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ध्वनिक्षेपकाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण

ध्वनिक्षेपकाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण

पुणे :गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे..
विद्यानंद बापट (वय 37) हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्यास आहेत. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेले बापट हे बीपीओ (BPO) क्षेत्रात 'वर्क फ्रॉम होम' काम करतात. त्यांच्या मागे कोणताही मोठा राजकीय वारसा नसून ते एक सामान्य व सुजाण पुणेकर म्हणून ओळखले जातात.

पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशोत्सवपूर्व नियोजन बैठकीत बापट यांनी डीजेच्या भिंती, लेझर आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात परखड भूमिका मांडली होती. 'आमचा गणेशोत्सवाला विरोध नाही, पण उत्सवाच्या नावाखाली होणारे ध्वनिप्रदूषण आणि मुख्य रस्ते बंद करून काढल्या जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमुळे रुग्णांना, वृद्धांना व सर्वसामान्यांना होणारा त्रास थांबला पाहिजे,' असे मत त्यांनी प्रभावीपणे मांडले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi