Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुबईत 'झाडाला पिकलाय आंबा' गाण्याची क्रेझ

दुबईत 'झाडाला पिकलाय आंबा' गाण्याची क्रेझ

राठमोळा संगीतकार 'सागर पाटिल' ने रचला इतिहास, दुबईत प्रदर्शित केले 'मॅंगो अँथम ' हे मराठी गीत दुबई, UAE :दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील (BeatXX) यांनी त्यांचे नवीन गाणे 'झाडाला पिकलाय आंबा - द मॅंगो अँथम' नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे.

भारतीय संस्कृती, आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. 'द मॅंगो अँथम' हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.

संस्कृती जपणारा कलाकार सागर पाटील हे केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नसून UAE मधील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते प्रथा.UAE या सांस्कृतिक उपक्रमाचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी विविध पारंपरिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, दुर्ग मोहिम यांसारख्या उपक्रमांद्वारे UAE मधील नव्या पिढीला भारतीय संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मराठी आणि भारतीय कुटुंबांमध्ये सांस्कृतिक जडणघडण अधिक दृढ झाली आहे. मध्यपूर्वेत ढोल-ताशाचा जागतिक ठसा सागर पाटील यांनी मध्यपूर्वेत पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीच्या प्रसारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईतील विविध मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी महाराष्ट्रीयन तालवाद्यांची ओळख प्रभावीपणे सादर केली आहे.

संगीतकार सागर पाटील (BeatXX) त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगतात, ''BeatXX' या कलाकार नावाखाली मी स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी संगीतशैली निर्माण केली आहे. मी संपूर्ण आखाती देश म्हणजेच मिडल ईस्ट देशात पहिल मराठी ढोल ताशा पथक सुरू केलं. त्यासाठी मला नुकताच महाराष्ट्र शासनाकडून 'मराठी भाषा सन्मान' पुरस्कार मिळाला आहे. भावना, कथा आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा आधुनिक संगीताशी केलेला संगम यामुळे संगीताची खास ओळख ठरली आहे. दुबईस्थित माझ्या होम स्टुडिओमधून मी विविध क्षेत्रांसाठी संगीत निर्मिती केली आहे, ज्यामध्ये लघुपटांसाठी बॅकग्राऊंड स्कोअर प्रादेशिक व अरबी चित्रपटांसाठी संगीत जाहिरातींसाठी जिंगल्स व ब्रँडेड ऑडिओ कंटेंट यांचा समावेश आहे. माझ नव गाण 'झाडाला पिकलाय आंबा - द मॅंगो अँथम' नुकतच प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच रसिक प्रेक्षकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येईन.'

Link - https://youtu.be/XuzydHilIaY?si=dXwFi-OqakNfbc36

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi