Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'गुंगी गुडिया' टिप्पणी निषेधार्ह; सपकाळांनी शब्द मागे घ्यावेत-दीपक मानकर

'गुंगी गुडिया' टिप्पणी निषेधार्ह; सपकाळांनी शब्द मागे घ्यावेत-दीपक मानकर

पमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावर माजी उपमहापौरांची प्रतिक्रिया; राजकीय टीकेत महिलांचा अवमान टाळण्याचे आवाहन

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवर माजी उपमहापौर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सपकाळ यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी मानकर यांनी केली.

राजकीय पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आणि टीका असू शकते; मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या महिलेबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची भूमिका मानकर यांनी मांडली. राजकारणातील टीकेची पातळी घसरू नये आणि महिलांचा सन्मान राखला जावा, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार या लोकशाही प्रक्रियेतून पुढे आलेल्या नेत्या असून त्यांच्याविषयी मतभेद असतील, तर काँग्रेसने त्यांच्या निर्णयांवर आणि कामकाजावर मुद्देसूद टीका करावी. त्यांच्याबाबत अवमानकारक शब्दप्रयोग करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असा आशय मानकर यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने महिलांच्या सन्मानाबाबत नेहमी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एका महिला नेत्याबाबत अशी टिप्पणी करणे विसंगत असल्याचेही मानकर यांनी म्हटले. सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सपकाळ यांनी 'गुंगी गुडिया' हा अपशब्द नसून सुनेत्रा पवार यांच्या मौनाचे वर्णन असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार देत सुनेत्रा पवार यांनी कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करावे, असे आव्हान दिले होते.

या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi