Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हा लोकशाहीचा विजय.दीप्ती चवधरी;कॉंग्रेस भवन मध्ये विजयोत्सव

हा लोकशाहीचा विजय.दीप्ती चवधरी;कॉंग्रेस भवन मध्ये विजयोत्सव

पुणे- गेली १२ वर्षे मनमानी व हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करणाऱ्या केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला अखेरीस विद्यार्थ्यांच्या प्रखर आंदोलनामुळे झुकावे लागले हा लोकशाहीचा मोठा विजय आहे.

असे पुणे शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी म्हटले आहे. दिल्लीतील सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे नरमल्या नंतर आज पुणे शहर कॉंग्रेस च्या मुख्य कॉंग्रेस भवनात विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या , त्या म्हणाल्या,' नीट पेपर फुटी मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेरीस राजीनामा द्याला लागला हि निश्चितच ऐतिहासिक घटना आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या बरोबरच लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने देखील संसदेत आणि संसदे बाहेर मोठा आवाज उठवला याच्या एकत्रित परिणामामुळे अखेरीस मोदी सरकारला झुकावे लागले. याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे शिवाय पालकांचे हि आभार मानले पाहिजे. गेली १२ वर्षे मोदी सरकारने देशात जे भीतीचे वातावरण निर्माण केले त्याचा चक्काचूर या विद्यार्थी आंदोलनाने झाला. 'प्रधान गेले आता पंतप्रधान हि जातील' हि भावना जनतेते व तरुणांमध्ये निर्माण झाली आहे, भय संपले आहे आणि लोकशाहीचा विजय झाला आहे हे या यशस्वी आंदोलनातून दिसून येते.

या विजयोत्सवात शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, नगरसेवक रफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, विशाल जाधव, राहुल वंजारी गुलामहुसेन खान, लतेंद्र भिंगारे, हर्षद हांडे, फैयाज शेख, चैतन्य पुरंदरे, अमित कांबळे, प्रदीप परदेशी,चेतन अगरवाल, गणेश गुगळे,समद शेख,ॲड राजश्री अडसूळ, राजश्री चव्हाण,ऋषिकेश जाधव संतोष देसाई, रमेश सोनकांबळे राजेंद्र भुतडा, अविनाश अडसूळ इत्यादी सहभागी झालेले दिसले

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi