Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खडकवासला धरणसाखळीचा पाणीसाठा आता ५.०९ टीएमसी; टेमघरचा 'श्रीगणेशा', पुण्यात 'थेंबे थेंबे तळे साचे'चा प्रत्यय

खडकवासला धरणसाखळीचा पाणीसाठा आता ५.०९ टीएमसी; टेमघरचा 'श्रीगणेशा', पुण्यात 'थेंबे थेंबे तळे साचे'चा प्रत्यय

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसाचा परिणाम आता खडकवासला धरणसाखळीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीचा प्रत्यय देत चारही धरणांतील एकूण पाणीसाठा ५.०९ टीएमसी (१७.४७ टक्के) इतका झाला आहे.

गेल्या २४ तासांत धरणसाखळीत ०.६४ टीएमसी पाण्याची भर पडली आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा नसलेल्या टेमघर धरणातही यंदाच्या हंगामातील पाणीसाठ्याचा श्रीगणेशा झाला असून धरणात ०.०९ टीएमसी (२.३१ टक्के) पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

रविवारी (५ जुलै) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार चारही धरणांमध्ये मिळून ७०४ एमसीएफटी पाण्याची आवक झाली. त्यापैकी वारसगावमध्ये ३२३ एमसीएफटी, पानशेतमध्ये २३८ एमसीएफटी, टेमघरमध्ये १०७ एमसीएफटी आणि खडकवासला धरणात ३६ एमसीएफटी पाण्याची आवक झाली.

सध्या पानशेत धरणात २.४५ टीएमसी (२२.९९%), वारसगावमध्ये २.२६ टीएमसी (१७.६६%), खडकवासला धरणात ०.३० टीएमसी (१४.९७%) आणि टेमघरमध्ये ०.०९ टीएमसी (२.३१%) पाणीसाठा आहे.

तथापि, गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १७.६७ टीएमसी (६०.६२%) पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा अजूनही १२.५८ टीएमसीने कमी पाणीसाठा असल्याने आगामी पावसाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

वारसगाव LLIO मधून ४०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.खडकवासल्यात बंद पाइप १८१ व कोपरा-कोटी २३१ क्युसेक्स पाणीपुरवठा सुरू आहे.टेमघरमध्ये यंदाचा पहिला उपयुक्त पाणीसाठा.


 खडकवासला धरणसाखळी (५ जुलै २०२६, सकाळी ६.००)

धरणआजचा पाऊस (मिमी)एकूण पाऊस (मिमी)पाणीसाठा (TMC)टक्केवारीआवक (MCFT)
खडकवासला241630.3014.97%36
पानशेत723782.4522.99%238
वारसगाव683592.2617.66%323
टेमघर1154200.092.31%107
एकूण5.09 TMC17.47%704 MCFT

 गेल्या २४ तासांतील बदल

बाब४ जुलै५ जुलैवाढ
एकूण पाणीसाठा4.45 TMC5.09 TMC+0.64 TMC
टक्केवारी15.26%17.47%+2.21%
एकूण आवक480 MCFT704 MCFT+224 MCFT
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi