Saturday, 06 Mar, 3.41 pm माय मराठी

होम
कोरोना व्हॅक्सीनच्या प्रमाणपत्रावरून पीएम मोदींचा फोटो हटवा, तृणमूल काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची भूमिका अद्याप अस्पष्ट

नवी दिल्ली-कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला जाऊ शकतो मात्र निवडणूक आयोगाने अजूनही यावर ठाम भूमिका स्पष्ट केलेली नाही .मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला तसे आदेश दिले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाची लस दिल्यानंतर लोकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. या फोटोवरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयासाठी आदेश जारी केल्याचे सांगितले जात आहे.

निवडणूक आयोगाने यास अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने कुणाचेही नाव न घेता आरोग्य मंत्रालयाला एक पत्र पाठवून आचारसंहितेचे पालन करण्यास सांगितले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथे निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे पत्र पाठवले आहे. सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या एक वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवून सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो लावता येणार नाही. इतर राज्यांमध्ये ते प्रमाणपत्र होते तसेच वापरता येतील.

तृणमूल काँग्रेसने सर्वप्रथम या प्रमाणपत्रांवर आक्षेप नोंदवला होता. मोदी कोरोनाच्या लसीकरण प्रमाणपत्रांवर आपला फोटो लावून केवळ आपल्या पदाचा दुरुपयोग करत नाहीत, तर डॉक्टर आणि नर्सच्या कष्टांचे स्वतः श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच, हे निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचेही उल्लंघन आहे असे डेरेक ओ ब्रायन म्हणाले होते. त्यांनी यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवताना सोशल मीडिया पोस्ट सुद्धा केली होती. ओ' ब्रायन यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला एक पत्र सुद्धा पाठवले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi
Top