Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोकायन 26 - भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शनीचे अमेरिकेतील बोस्टनहून प्रस्थान.

लोकायन 26 - भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शनीचे अमेरिकेतील बोस्टनहून प्रस्थान.

मुंबई -भारतीय नौदलातील प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी, ने लोकायन 26 मोहिमेचा भाग म्हणून अमेरिकेतील बोस्टन शहरातून 25 जुलै 2026 रोजी प्रस्थान केले. या भेटीदरम्यान, जहाजाने प्रतिष्ठित सेल 250 या सोहळ्यात आणि आंतरराष्ट्रीय नौदल आढावा 250 मध्ये अभिमानाने भारताचे प्रतिनिधित्व केले तसेच व्यावसायिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे सागरी भागीदारी बळकट करत भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर मांडला.

या जहाजाने बाल्टिमोर नॉरफोक येथे सेल 250 कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि विविध मान्यवर, भारतीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय नौदल शिष्टमंडळांचे स्वागत करून सागरी सहकार्य आणि मैत्री यांप्रती असलेली भारताची कटिबद्धता अधोरेखित केली.

आयएनएस सुदर्शनी आता अझोरेश (पोर्तुगाल) मधील पॉन्टा डेलगाडा च्या दिशेने रवाना झाली आहे. जागतिक पातळीवर भारताची सागरी क्षमता, व्यावसायिकता आणि सद्भावना यांचे प्रतीक म्हणून हे जहाज आपली सेवा बजावत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi