Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

क महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात जणांचा परतीचा प्रवास सुरू, बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती

पुणे : नेपाळमधील महापूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नागरिकांबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या ताज्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील आठ नागरिक सुरक्षित आहेत, तर रहाटणी येथील जितेंद्र प्रमोद पाटील यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या शोधासाठी मंत्रालय नियंत्रण कक्षासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे.

स्मिता पवार मुंबईत सुखरूप

नेपाळमध्ये अडकलेल्या स्मिता पवार या मुंबईत सुखरूप पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षित परतीची अधिकृत नोंद झाली आहे.

सुनीता पाटील, वंदना बहिरट, मेघना जोशी, उत्तम भारती, भारती मॅडम, संगीता लाडके आणि अनिल लाडके हे सात जण कैलास पर्वत परिसरात सुखरूप आहेत. त्यांचा परतीचा प्रवास सुरू असून ते नातेवाईक तसेच पुणे जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहेत.

रहाटणीतील एकजण अद्याप बेपत्ता

मात्र रहाटणी येथील जितेंद्र प्रमोद पाटील यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. जिल्हा प्रशासनाच्या 30 ऑगस्टच्या अहवालात त्यांची नोंद 'मिसिंग' अशी करण्यात आली आहे.

त्यांच्याबाबतची माहिती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून मंत्रालय नियंत्रण कक्षाने ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी यंत्रणा कार्यरत

कालच्या उपलब्ध माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. राज्यातील नागरिकांशी संपर्क साधणे, त्यांचा सुरक्षित प्रवास निश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार वाहतुकीची व्यवस्था करणे यावर भर देण्यात आला होता.

आज पुणे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली स्वतंत्र यादी या प्रयत्नांमधील पुणे जिल्ह्याची ताजी स्थिती स्पष्ट करते.

नेपाळमध्ये आणखी पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री 1077 किंवा 020-26123371 / 9370960061 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi